॥ अग्निहोत्र व त्याचे विज्ञान ॥ Agnihotra in marathi ॥

॥ अग्निहोत्र व त्याचे विज्ञान ॥ Agnihotra in Marathi

 वायु, जल,  ध्वनी,  चित्त व विचार यांच्यात जर प्रदूषण  झाले तर जीवन अनेक रोगांचे घर बनते. यांच्या शुद्धीसाठी प्रत्येक घरात नित्य सूर्योदय व सूर्यास्ताला अग्निहोत्र करावे. 

1) अग्निहोत्र विधी ची सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ का? | Agnihotra time

बरोबर यावेळी अनेक तर्‍हेच्या सूक्ष्म शक्ती जसे इथर, इलेक्ट्रीसिटीज, इलेक्ट्रोमॅग्नेटीक वेव्हज इ. सूर्याकडून पृथ्वीवर प्रचंड प्रमाणावर कोसळत असतात. याच सूक्ष्म शक्ती अग्निपात्र स्वत:कडे खेचून घेते म्हणूनच अग्निहोत्र फक्त सूर्योदय व सूर्यास्तसमयीच करता येते. 

2) तांब्याचे पिरॅमिड आकाराचे पात्र का? | Tambache Pyramid Patra

Agnihotra in marathi

 ग्रीकभाषेत ‘Pyro’ = अग्नि व ‘Amid’= मध्यभाग = ज्या आकाराच्या मध्यभागी अग्नि असतो त्याला ‘पिरॅमिड’ असे म्हणतात. पिरॅमिड आकारात विद्युत चुंबकीयशक्ती केंद्रीभूत होऊन आत ठेवलेल्या पदार्थांचे संरक्षण करते. पिरॅमिड उर्जा सौरउर्जेपेक्षा कितीतरी पटीने क्रांतीकारी असते. अंतरिक्षात निर्माण होणार्‍या प्रचंड शक्तीचे विकेंद्रीकरण करून त्यांना आपल्या आजुबाजूच्या वायूमंडलांत प्रसारित करण्याचे कार्य तांब्याचे अग्निपात्र करते. जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक आश्‍चर्य असलेले ईजिप्तमधील पिरॅमिड हे आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेल्या अग्निहोत्राच्या अग्निपात्राची उलटी प्रतिकृती आहे. पिरॅमिडआकारात प्रविष्ट होणार्‍या विद्युत चुंबकीयशक्तिने (Electromagnetic powers) खाद्यपदार्थ, कच्चे दुध, मृत शरीर इ. कोणताही पदार्थ सडत नाही व त्याचा दुर्गंधही येत नाही. तांबे हे विद्युतवाहक तर आहेच परंतु सर्व धातूचे मूळ अणू (Moleculus) विभिन्न आकाराचे असतात परंतु तांब्याच्या मूळ अणुचा आकार हा हुबेहुब अग्निपात्रासारखा (झूीराळव ीहरशि) असल्यामुळे तांब्याच्या अग्निहोत्रपात्रातून उत्पन्न होणारी चुंबकीय शक्ती वातावरणाला प्रदूषणमुक्त करते. अग्निपात्राचा आकार लांबी 10 अंगुळे व उंची 7 अंगुळे एवढा असावा. पात्राचा आकार 14.5 x14.5 सें.मी. तर तळ 5.25×5.25 सें.मी. असावा आणि उंची 6.5 सें.मी. असावी. उंचीकडे समपरिमाणात 3 सोपान असावेत. प्रत्येक सोपानाबरोबर अग्निपात्राची लांबी व रुंदी वाढत जाते आणि शेवटी त्या पात्राच्या तोंडाचा 4×4 इंच असा आकार असतो.

3) गाईचे शेण | Gaiche Shen

 गाईच्या शेणात ‘फॉरमल्डीहाईड’ हे जंतुनाशक आहे म्हणून अग्निहोत्रासाठी पात्रात औषधीगुणांनी युक्त वड, पिंपळ, उंबर, बेल व पळस (यज्ञीयवृक्ष) यांच्या वाळलेल्या बोटाएवढ्या कांड्या (समिधा) पात्राच्या मध्यभागी रिकामी जागा राहील अशा ठेवतात व त्याबरोबर शेण्याचा कुस्करा टाकून कापूर, गुग्गुळ वा गाईच्या तुपाची वात यांनी अग्नी पेटवितात. अग्निहोत्रापूर्वी 10 मि. अगोदर पात्रात अग्नी प्रज्वलित करून तो निर्धूम राहील असा पेटवावा.

4) गाईचे तूप- 

गाईच्या तुपात 11 अ‍ॅसिड, 12 धातू, 2 लेक्टोज व एथिलीन ऑक्साइड, प्रॉपिलीन ऑक्साइड, फॉर्मरडिहाइड व बीटा प्रापिओ लॅक्टोन हे 4 वायू आहेत. आहुती दिल्यानंतर गोधृतातून प्रखर उष्णतेची ऊर्जा असलेला ‘अ‍ॅसिटिलिन’ निर्माण होतो व तो दूषित वायूस आपल्याकडे खेचून त्याला शुद्ध करतो त्यामुळे अग्निहोत्राचा परिसर वायूप्रदूषणरहित होतो. अग्निहोत्र जर शेताच्या चारही दिशांना केले तर पिकाची उत्पादनक्षमता 30-40 टक्के वाढते व घरात केले तर घरातील वातावरण रोगमुक्त होते. 

5) तांदूळ-

 तांदळात 12% आर्द्रता व बाकी स्टार्च असतो. तांदळाच्या कवच्याचे द्रव्य कठोर व तैलयुक्त असते. त्याच्यात ऑलिन (Olien) व अल्ब्युमिनस (Albuminus) असते. तांदूळ सहज उपलब्ध असतो म्हणून अग्निहोत्रासाठी अखंड निवडलेला तांदूळ वापरतात. एक महिन्याच्या अग्निहोत्राला 200 ग्रॅम तांदूळ लागतो. अग्निहोत्रामुळे जो शुद्ध, पोषक व सुगंधी वायु निर्माण होतो तो श्‍वासाद्वारा शरीरात जातो व त्यामुळे रक्तसंचार सुगम होऊन मेंदुला विश्रांती मिळते.

 6) मंत्रध्वनी | Mantra Dhvani

आहुतीबरोबरच्या मंत्रध्वनीमुळे दिव्यतरंग निर्माण होऊन परिसर मंगलमय होतो. 

7) कृती | Agnihotra kruti

वाटीत चिमुटभर तांदुळात तांदुळ ओले होतील एवढे शुद्ध गाईचे तूप एकत्र करा व पुढील मंत्र म्हणून आहुती द्या. 

अग्निहोत्र मंत्र | Agnihotra Mantra-
  1. सूर्योदय (agnihotra mantra suryoday) – सूर्याय स्वाहा।, सूर्याय इदं न मम। (आहुती) प्रजापतये स्वाहा ।, प्रजापतये इदं न मम। (आहुती)

2. सूर्यास्त(agnihotra mantra suryaasta) – अग्नये स्वाहा।, अग्नये इदं न मम। (आहुती) प्रजापतये स्वाहा ।, प्रजापतये इदं न मम। (आहुती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *