॥ गायत्रीमंत्र उपासना मराठी ॥ Gayatri Mantra Marathi and Upasana॥

गायत्रीमंत्र / Gayatri Mantra Marathi | words for gayatri mantra

ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात् ॥ॐ॥

गायत्री मंत्र व त्याचा अर्थ | Gayatri mantra with meaning

‘मननात त्रायते’ मनन केले असता रक्षण करणारे जे शब्द त्याला ‘मंत्र’ म्हणतात. गायत्रीमंत्र हा विश्‍वातला सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. त्याचा अर्थ देत आहोत. गायत्रीमंत्र – ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात् ॥ॐ॥

गायत्रीमंत्राच्या शब्दांचा अर्थ | meaning of om bhur bhuva swaha

 ॐ – परब्रह्म, भू:- पृथ्वी, भुव:- अंतरिक्ष, स्व:- स्वर्ग, तत्- त्या, सवितु- सूर्य, वरेण्यम्- प्रार्थनीय, भर्गो- पाप चिरडून टाकणे, देवस्य- प्रकाशमान, धीमहि- चिंतन करणे, धियो- बुद्धी, यो- जो, न:- आमच्या, प्रचोदयात्- प्रबल प्रेरणा देणे. 

गायत्री मंत्राचा अर्थ | Gayatri mantra with meaning 

प्रणवोत्पन्न पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग यांच्याही पलिकडे असणार्‍या सूर्यदेवाच्या पापदाहक तेजाचे आम्ही ध्यान करतो, तो सूर्यदेव आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.

गायत्रीमंत्र उपासना | Gayatri Mantra Marathi Upasana|

     ‘गय’ म्हणजे ‘प्राण व तै’ म्हणजे रक्षण करणे यावरून जी प्राणांचे रक्षण करते ती गायत्री होय. जेव्हा आचार्य शिष्याला गायत्रीमंत्राचा पाठ देतात तेव्हा ते शिष्याचे अज्ञानापासून रक्षण करतात (बृहदारण्योकपनिषद 5.14.4)

श्रीमनुंनी गायत्री मंत्राच्या उत्पत्ती विषयी सांगितलेले आहे. ते म्हणतात | Gayatri mantra utpatti.

 त्रिभ्य एव तु वेदभ्यपादं पादमदूदुहत्। तदित्यृचोऽस्यासावित्र्यापरमेष्ठी प्रजापति: (मनु. 2.77) 

अर्थात- तद् इत्यादी गायत्रीमंत्राचे तीन चरण परमेष्ठी प्रजापतीने तीन वेदांतून एकेक करून दोहून घेतले. पुढे मनु म्हणतात- त्रिपद गायत्री हे वेदाचे मुख आहे. हिचा जप करणार्‍याला वेदत्रयाच्या अध्ययनाचे पुण्य मिळते. जो तीन वर्षे सतत प्रणवव्याहृति (ओंकार) युक्त गायत्रीमंत्राचा जप करतो तो ब्रह्मलोकाला जातो. एतावता गायत्रीमंत्राहून श्रेष्ठ असा मंत्र नाही (मनु. 2.78-83)

     त्रिपाद गायत्री Tripada Gayatri Mantra Marathi- 

सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीन काळी गायत्रीची तीन भिन्न रूपे सांगितलेली आहेत. सकाळी-गायत्री, दुपारी-सावित्री व संध्याकाळी (सरस्वती), त्रिकाळानुसार अनुक्रमे ती ऋक-यजु: सामरूप, हंस, वृषभ व गरूडवाहना; बाला, तरूणी व वृद्धा; आरक्त, कर्पूरगौर व श्यामा अशी असते. (नारदपूर्वतापिनी उ. 27.55.57)

     सवितृ देवाच्या उपासनेसाठी गायत्रीमंत्र आहे. ऋग्वेद संहितेतील सवितृ देवतात्मक गायत्री छंदातील हा पहिलाच मंत्र आहे. कदाचित या कारणासाठी हाच मंत्र सांगितला असावा. सूत्रकारांनी या मंत्राला गायत्री न म्हणता सावित्री म्हटले आहे. मात्र सूत्रोत्तर काळात या मंत्राची देवता सविता ऐवजी सूर्य ठरली. लोकप्रिय झाल्यामुळे त्या मंत्राची देवताही गायत्रीच समजली जाऊ लागली. कालक्रमाने याचे महत्त्व एवढे वाढले की आर्य व व्रात्य यांच्यातला मुख्य भेद गायत्रीचा उपदेश व त्याचा अभाव एवढाच राहिला. गायत्रीरहस्य व गायत्री उपनिषद हे तिच्याविषयीचे दोन ग्रंथ असून त्यात तिची प्रशंसा केलेली आहे. गायत्री मंत्रातील प्रत्येक अक्षर प्रतीकात्मक मानलेले आहे. या चोवीस अक्षरांनी आग्रेयादी चोवीस देवता, वसिष्ठादि चोवीस ऋषी, प्रल्हादादी चोवीस शक्ती, पृथिव्यादी चोवीस मूलतत्त्वे व चंपकादि चोवीस पुष्पे दर्शवली आहेत.

     या मंत्रात सवितृदेवीची तेजोमय आराधना असून सविता सूर्य हा तेज व ज्योती यांचा मूलस्रोत आहे. विश्‍वाचे जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. मानवी क्रियांना प्रेरणा देत असल्यामुळे या मंत्रात तशी प्रार्थना केलेली आहे. योगदर्शनात सूर्य आत्म्याचे प्रतिक मानलेले आहे. म्हणून सूर्यतेजाचा अर्थ आत्मतेज असाही होऊ शकतो. साधनेच्या परंपरेत गायत्री मंत्राला कामप्रद चिंतामणी मानलेले आहे.

     शताक्षरी गायत्री Shatakshari Gayatri-

‘तत्सवितुर्वरेण्यं’ या मंत्राची 24 अक्षरे, ‘जातवेदसे सुनवाम’ या मंत्राची 44 अक्षरे व ‘त्र्यम्बकं यजामहे’ या मंत्राची 32 अक्षरे मिळून 100. अशी अक्षरे मिळून शंभर अक्षरी अक्षरी गायत्री होते.

ॐ भूर्भुव: स्व : तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि! धियो यो न: प्रचोदयात! ॐ जातवेदसे सुनवाम सोममराती यतो निदहाति वेद:! स न: पर्षदतिदुर्गाणि विश्वानावेव सिंधु दुरितात्यग्नि:! ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम! उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात !!

गायत्री पुरश्‍चरण- 

पाच अंगे- 1.जप 2.होम 3.तर्पण 4.मार्जन 5.ब्राह्मणभोजन अशी पाच अंगे असलेल्या क्रीयेला पुरश्‍चरण म्हणतात. मंत्राची जेवढी अक्षरे असतील, तितके लक्ष किंवा कोटी अशी संख्या पुरश्‍चरणासाठी घेतात. गायत्री मंत्र 24 अक्षरांचा असल्यामुळे सामान्यत: त्याचे चोवीस लक्षांचे पुश्‍चरण करतात. गुरूंकडून मंत्र मिळाल्यावर तो सिद्ध करावा लागतो. पुरश्‍चरणाने तो सिद्ध होतो व त्यात सामर्थ्य येते. कशानेही अडथळा येणार नाही अशी जागा निवडावी. शुभमुहुर्त बघुन संकल्प करावा. पुरश्‍चरणाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी प्रथम कृच्छ्रादी प्रायश्‍चित्ते करतात. 10 सहस्र गायत्रीजप, आपोहिष्ठा इ. सूक्तांचा पाठ, रुद्रसूक्तांचा पाठ व ऋषितर्पण ही आदल्यादिवशी करतात. दुसर्‍या दिवशी संकल्पपूर्वक पुण्याहवाचन, मातृकापूजन व नांदीश्राद्ध करतात. दर्भासन, हरिणाजिन वा लोकरीचे कापड आसन म्हणून घेतात. ‘पृथ्वि त्वया धृता लोका’ अशा मंत्रांनी आसनविधी करतात. नंतर न्यास (इष्टदेवतेची किंवा मंत्राची स्थापना) करतात. मग देवतांची प्रार्थना, जपमाळेचे प्रोक्षण व सवित्याचे ध्यान करून जपाला आरंभ करतात. जप करताना मौन धरतात. प्रत्येक दिवशी ठरावीक संख्येचा जप करणे व मध्यान्हापर्यंत संपविणे आवश्यक असते. जपमाळ 54 किंवा 108 मण्यांची असावी. ती बोटाचा मधल्या पेरावर ठेवून तिच्यातले मणी अंगठ्यांच्या टोकाने ओढावे, असा साधारण नियम आहे. तुटलेली, इतरांनी वापरलेली, अपवित्र माळ वापरू नये. जपसंख्या पूर्ण झाल्यानंतर त्याच्या एक दशांश हवन करतात. हवनाची प्रधानदेवता सविता ही असते. चरू, तिल, पायस, दूर्वा व समिधा ही होमद्रव्ये असतात. पुरश्‍चरणाची जी कामना असेल तिच्याप्रमाणे हवनीय द्रव्यात बदल करावा लागतो. कामना व हवनद्रव्ये- सर्वपापनाश (तिल), शांती (यव), आयुष्य (घृत (तिलघृत), घृतौदन), कार्यसिद्धी (मोहरी), ब्रह्मवर्चस, विद्या (दूध (पलाश)), पुत्र (दही), धान्य (साळी), ग्रहशांती (समिधा), धन (बेलफळे), ऐश्‍वर्य (कमल), आरोग्य (दूर्वा व दूध), सौभाग्य (गुग्गुळाच्या पोळ्या) (विष्णुधर्मोत्तर 1.165.34-39)

     हवनाच्या दशांश मार्जन, त्याच्या दशांश तर्पण आणि त्याच्या दशांश ब्राह्मणभोजन विहीत आहे. पुरश्‍चरण-2400000, मंत्राला स्वाहाकार जोडून हवन-240000, मंत्राच्या शेवटी ‘सवितारं तर्पयामि’ हे शब्द जोडून तर्पण-24000, मंत्राच्या शेवटी ‘आत्मानं मार्जयामि’ हे शब्द जोडून मार्जन- 2400, ब्राह्मणभोजन- 240, एकुण संख्या- 26,66,640

     एखाद्याला वरील हवनादी पुरश्‍चरणांगे पूर्ण करणे अशक्य असल्यास तितक्या संख्येने गायत्री जप केल्यानेही पुरश्‍चरणफल मिळते. वरील दशांश पद्धतीप्रमाणे शतांश पद्धतीही स्वीकारण्याची चाल आहे.

     पुरश्‍चरण पूर्ण झाल्यावर कर्त्याने आचार्याला यथाशक्ति दक्षिणा देऊन कर्म ईश्‍वरार्पण करायचे असते. असत्य भाषण व पुरश्‍चरणभूमीच्या बाहेर जाणे हे या काळात टाळायचे असते. तसेच भूमिशयन करावे, चातुर्मास्यात पुरश्‍चरण करू नये.

     गायत्रीशापमोचन- अनेक ऋषींनी गायत्रीमंत्राला निष्फलतेचे शाप दिलेले आहेत. त्यातून त्याला मुक्त केल्याशिवाय  गायत्रीचे अनुष्ठान करू नये. त्यासाठी पुढील मंत्र जपावेत-

1. ब्रह्मशापविमोचन- 

ॐ गायत्री सततं भजामि।

विश्‍वगर्भातुर्यस्मिन् देवा जाता अजायन्त अग्रे तां प्रजापति: मारूत: शक्ति: सावित्री भजे विश्‍वमाद्यं सृजन्तीम् ।

ब्रह्मशापविमुक्ता भव। 

2. विश्‍वामित्रशापविमोचन- 

ॐ गायत्री सततं भजामि।

सुमुखी विश्‍वगर्भा यदुद्भवा देवश्‍चक्रिरी विसृष्टि:।

यत्कल्याणी अभीष्टकरी प्रपद्ये ।

यन्मुखान्नि:सृतो वेदगर्भ: ।

विश्‍वामित्रशापमुक्ता भव। 

3. वसिष्ठशापविमोचन- 

ॐ अहो महान् विश्‍वरूपे दिव्ये संध्ये सरस्वती ।

अजरे अमरे देवि ब्रह्मविद्ये नमोऽस्तुते।

वसिष्ठशापमुक्ता भव।

गायत्रीष्टी- 

एक इष्टी. संवर्ग अग्रीसाठी अष्टाकपाल पुरोडाशाचा याग करणे, याला हे नाव आहे. या इष्टीला गायत्रीष्टी म्हणण्याविषयी मैत्रायणी संहितेत एक कथा आहे- देव व असुरांचे भांडण चालू असताना गायत्रीने त्या दोघांचे अन्न घेतले व ती दोघांच्या मध्यभागी उभी राहिली. तेव्हा ते दोघेही असे म्हणाले की आपण तिला बोलावू. ती ज्याच्याकडे जाईल त्याला अन्न मिळेल. त्यांनी तसे केले पण ती कोणाकडे गेली नाही. अशा वेळी देवांना एक मंत्र दिसला. ‘बल, इंद्रिय, धैर्य, स्वर्ग इ. तूच आहेस’ असा त्या मंत्राचा अर्थ होता. तो मंत्र देवांनी जपल्यामुळे गायत्री संतुष्ट झाली. ती देवांकडे गेली. नंतर देवांनी संवर्ग अग्रीसाठी याग केला (2.1.11)

अन्न मिळवण्यासाठी अथवा राष्ट्राराष्ट्रांमध्ये स्पर्धा उत्पन्न होईल तेव्हा ही इष्टी करावी, असे मैत्रायणी संहितेततैत्तरीय संहितेतही सांगितले आहे. (तै.सं. 2.4.3) या इष्टीचे सर्व तंत्र दर्शपूर्णमासाप्रमाणेच असते.

संध्या वंदन व गायत्री मंत्र | Sandhya Vandan and Gayatri Mantra

    सूर्योदय व सूर्यास्त यांच्या संधिकाळात विधिपूर्वक केली जाणारी परमेश्‍वराची आराधना म्हणजे संध्या होय. 

संध्या हिनोऽ शुचिर् नित्य मनर्हसर्व कर्मसु॥

यदन्यत् कुरुते कर्म न तस्य फलभाग भवेत्॥1

जो संध्या करत नाही त्याला आरोग्य व सत्कर्माचे फळ प्राप्त होत नाही म्हणून संध्या व गायत्रीमंत्राचा जप नित्य करावा. संध्या स्नानानंतर करावी. त्यावेळी धूतवस्त्र, सोवळे वा धाबळ नेसावी. संध्या प्रात:, माध्यान्ह व सूर्यास्त अशी त्रिकाळ करावी. 

साहित्य– 

आसन, पाण्याने भरलेला तांब्या, पंचपात्र (फुलपात्र), पळी व ताम्हण (पूजेसाठी सर्व भांडी तांब्याच्या धातूची असावीत.) संध्या करताना आपले तोंड पूर्व वा उत्तर दिशेकडे असावे. 

संध्येतील काही शब्दांचा अर्थ-

1. आचमन |Achamanam- 

उजवा तळहात उताणा करावा. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळावर टेकवावे म्हणजे तळहाताचा आकार द्रोणासारखा होईल. त्यात पळीभर पाणी घ्यावे व आवाज न करता प्राशन करावे. याला ‘आचमन’ म्हणतात त्यामुळे घशातील कफ व चिकटपणा नाहिसा होऊन आतडी थंड होतात.

2. प्राणायाम-

 यात पूरक- श्‍वास आत घेणे, अंतर्कुंभक- आत घेतलेली हवा फुफ्फुसात ठेवणे, बहिर्कुंभक- हवा आत घेण्यापूर्वी निष्क्रिय राहणे व रेचक- घेतलेली हवा बाहेर सोडणे या चार पद्धतींना विशेष महत्त्व आहे. श्‍वास आत घेणे (पूरक- 20 अंक मोजेपर्यंत) घेेतलेला श्‍वास आत कोंडणे (कुंभक- 80 अंक मोजेपर्यंत) व तो श्‍वास बाहेर सोडणे (रेचक – 40 अंक मोजेपर्यंत) याला प्राणायाम म्हणतात. हृदय, फुफ्फुसे यांना व्यायाम मिळतो. जितका श्‍वास संथ चालतो तितका तो माणूस दीर्घायूषी व संयमी असतो. 

3. मार्जन- 

शरीर, वस्तू व परिसर यांच्या शुद्धीकरणासाठी मंत्रोच्चार करून दर्भाने पाणी शिंपडणे याला मार्जन म्हणतात त्यामुळे परिसर प्रदूषणमुक्त होतो. 

4. अघमर्षण- 

एका नाकपुडीने श्‍वासरोधन करून तो श्‍वास दुसर्‍या नाकपुडीने हातात घेतलेल्या पाण्यात सोडणे व ते पाणी आपल्या डाव्या बाजूस जमिनीवर सोडणे याला अघमर्षण म्हणतात. या क्रियेने श्‍वसनइंद्रियांचा व्यायाम होते.

5. अर्घ्य-

 ओंजळीत पाणी घेऊन इष्टसंकल्पपूर्तीसाठी इच्छित देवतेला प्रसन्न करण्यासाठी पाणी सोडणे याला अर्घ्य म्हणतात त्यामुळे उपासक व उपास्यदेवता यांची जवळीक होते. 

6. न्यास- 

शरीरात असलेल्या देवतांना मंत्रोच्चाराने स्पर्श करून त्यांना जागृत करणे याला न्यास असे म्हणतात.

7. उपस्थान- 

देवतांची प्रार्थना करणे. 

8. विसर्जन-

 ईश्‍वरार्पण करणे, सांगता करणे. संध्या करताना 1.पूर्व वा उत्तरेकडे तोंड करून आसनावर बसणे.

9. आसन- 

आसनाचे सात्त्विक (दर्भ, धूतवस्र, मृगाजिन), राजस (कांबळ, घोंगडी, रेशमी, बेत्रासन) व तामस (व्याघ्राजिन, लाकडीपाट, न धुतलेले मलीन वस्त्र व जमीन) असे तीन प्रकार आहेत. यातील सात्त्विक आसनांचा वापर करावा. आसन व लाभ- 1.दर्भ- ध्यान 2.कृष्णाजिन- ज्ञान 3.व्याघ्र- मोक्ष व लक्ष्मी 4.कांबळ- दु:खनाश व शांती 5.नीलवर्ण- शत्रुनाश 6.लालवर्ण- वशीकरण 7.हत्तीण- रोगनाश 8.बांबू- दारिद्रय 9.दगड- रोगप्राप्ती 10.केवळ जमीन- अनंत दु:खे 11.फुटलेला लाकडी पाट- दुर्भाग्य. लाकडी पाटाचा आसन म्हणून वापर करू नये. 

10. आराधना- 

प्रभातकाळ- उदयात्प्राक्तनी संध्या घटिकात्रयमुच्यते॥ (एक घटका म्हणजे 24 मि.)- सूर्योदयापूर्वी तीन घटका म्हणजे 72 मिनिटे (1 तास 12 मिनिटे) आधी उपासना करावी. 

उत्तमा तारकोपेतोमध्यमा लुप्त तारका ।

अधमा सूर्यसहिताप्रातसंध्या त्रिधा मता:

अर्थ- आकाशात तारे दिसत असताना- सर्वश्रेष्ठ वेळ, तारका नाहिशा झाल्यावर प्रारंभ- मध्यमवेळ व सूर्योदयाबरोबर वा नंतर प्रारंभ-कनिष्ठकाळ. माध्यान्हकाळ- (तीन तासांचा एक प्रहर याप्रमाणे चार प्रहराचा एक दिवस मानला तर तिसर्‍या प्रहरी म्हणजे 12 ते 3 पर्यंत माध्यान्हसंध्या वा उपासना करावी.) 

संध्योत्तमा तृतीयेऽशे पंचधांशे दिनस्य तु।

माध्यान्हिकी तर्द्ध्वं वा पूर्वं वा स्याद्विवैव हि॥

व सायंकाळ– उत्तमा सूर्य सहिता मध्यमा लुप्त भास्करा ।

अधमा ऋक्ष संयुक्ता सायंसंध्या त्रिधा मता:

सूर्य असताना सर्वोत्तम, सूर्य अस्तास 24 मि. कमी असताना- ‘रवेरस्तमयात्पूर्व घटिकैका यदा भवेत’ (स्कंदपुराण) पूजा, संध्या करावी. सूर्य अस्तास गेला परंतु चांदण्या दिसत नाहीत तो मध्यम काळ. चांदण्या दिसू लागल्यावर निकृष्ट काळ होय. उपासना स्थान- पर्वताग्रे नदीतीरे विल्ब मूले जलाशये। गोष्ठे देवालयेऽश्‍वत्थे उद्याने तुलसीवने॥ अर्थ- पर्वतशिखर, नदीतीर, बेल वा अश्‍वस्थ वृक्षाच्या छायेखाली, तलाव, सरोवर, बाग, तुलसीवन, देवालय, गाईच्या गोठ्यात वा एकांतस्थानी बसून, पूजा, उपासना, जप, वाचन, पारायण करावे अन्यथा आपल्या घरातील एका कोपर्‍यात देवघर मांडून तेथे एकाग्रमनाने उपासना करावी.

     11.यज्ञोपवीत | Yadnyopavit | Janeu-

 संध्या करणार्‍या माणसाच्या छातीवर जानवे (यज्ञोपवित) असावे. जर यज्ञोपवित भंग झाले तर डोक्यावरून पाठीच्या बाजूने पुढील मंत्र म्हणून काढावे. मंत्र- एतावद्दिन पर्यन्तं ब्रह्मत्वं धारितं मया। जीर्णत्वात् त्वत् परित्यागो गच्छ सूत्र यथासुखम्॥ व विसर्जन करावे. नूतन यज्ञोपवीत डाव्या हातात घेऊन पाण्याने भिजवून उजव्या हाताने त्यावर पाणी सिंचन करीत असता गायत्रीमंत्राचे पठण (10, 21, 108) करावे. नंतर ते दोन्ही हातात धरून सूर्यास दाखवावे व पुढील मंत्र म्हणून परिधान करावे. मंत्र- ॐ यज्ञो पवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात्। आयुष्यमग्र्यं प्रतिमुंच शुभं यज्ञोपवीतं बलमस्तु तेज:।

॥ संध्या प्रारंभ: ॥ How to do Sandhya in Marathi

     (1) आचमनम्- 

ॐ केशवाय नम:। ॐ नारायणाय नम:। ॐ माधवाय नम:। या तीन नावाचा उच्चार दोन वेळा आचमन करून करावा व नंतर ॐ गोविंदाय नम: म्हणून उजव्या हातातील पाणी ताम्हणात सोडावे व पुढील नावांचा उच्चार करावा- ॐ विष्णवे नम:। ॐ मधुसूदनाय नम:। ॐ त्रिविक्रमाय नम:। ॐ वामनाय नम:। ॐ श्रीधराय नम:। ॐ ऋषीकेशाय नम:। ॐ पद्मनाभाय नम:। ॐ दामोदराय नम:। ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम:। ॐ प्रद्युम्नाय नम:। ॐ अनिरूद्धाय नम:। ॐ पुरूषोत्तमाय नम:। ॐ अधोक्षजाय नम:। ॐ नारसिंहाय नम:। ॐ अच्युताय नम:। ॐ जनार्दनाय नम:। ॐ उपेन्द्राय नम:। ॐ हरये नम:। ॐ श्रीकृष्णाय नम:। नंतर प्राणायाम करावा.

     (2) प्राणायाम- 

नाकाची उजवी नाकपुडी उजव्या हाताच्या अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीने श्‍वास घ्या. नंतर तो श्‍वास करंगळी व अनामिका (करांगुलीजवळचे बोट) यांनी डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने सोडा. उजव्या नाकपुडीने हळूहळू बाहेर सोडावा म्हणजे प्राणायाम पूर्ण होतो. ही कृती आलटूनपालटून करताना गायत्री मंत्र म्हणावा. श्‍वास घ्या व तो कोंडून ठेऊन ॐ प्रणवस्य, परब्रम्ह ऋषि:। परमात्मा देवता। दैवी गायत्री छन्द:। सप्तानां व्याहृतीनां, विश्‍वामित्र-जमदग्नि-भरद्वाज-गौतमात्रि-वसिष्ठ-कश्यपा- ऋषय:। आग्निवाय्वादित्य बृहस्पति वरूणेन्द्र विश्‍वेदेवा देवता:। गायत्र्युष्णिगनुष्टुब्बृहती-पङ्क्ति-त्रिष्टुब्-जगत्यश्छन्दांसि। गायत्र्या, विश्‍वामित्र ऋषि:। सविता देवता। गायत्री च्छन्द:। गायत्रीशिरस: प्रजापतिर्ऋषि:। ब्रह्मग्निवाय्वादित्या देवता:। यजुश्छन्द:। प्राणायामे विनियोग:। ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम् । ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्। हा मंत्र तीन वेळा मनातल्या मनात जपावा, कोंडलेला श्‍वास बाहेर सोडावा. ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्म भूर्भुव:स्वरोम्॥ नंतर पळीने उजव्या हातावर पाणी घ्यावे व संकल्पाचा मंत्र म्हणून संकल्प सोडावा.

     (3) संकल्पमंत्र- 

ममोपात्तदूरितक्षयद्वारा श्रीपरमेश्‍वरप्रीत्यर्थं प्रात: (माध्यान्ह वा सायंसंध्या करताना- माध्यान्हं वा सायं असा उच्चार करावा) संध्यामुपासिष्ये। उजव्या हातातील पाणी बोटांच्या टोकांकडून ताम्हणात सोडावे.

     (4) प्रथममार्जनम्-

 पळीत पाणी घेऊन ते पाणी दर्भांनी अंगावर शिंपडावे (प्रोक्षण) याला मार्जन म्हणतात. आपोहिष्ठेतितृचस्य सूक्तस्याम्बरीष: सिन्धुद्वीप ऋषि:। आपो देवता। गायत्री च्छन्द:। मार्जने विनियोग:। ॐ आपो हि ष्ठा मयोभुव:। ॐ ता न ऊर्जेदधातन। ॐ महे रणाय चक्षसे। ॐ यो व: शिवतमो रस:। ॐ तस्य भाजयतेह न: । ॐ उशतीरिव मातर:। ॐ तस्मा अरं गमाम व:। ॐ यस्य क्षयाय जिन्वथ । ॐ आपो जनयथा च न:॥

     (5) मंत्राचमनम्- 

आचमनाच्या वेळी करतो तसा उजव्या हाताचा द्रोणाकार करून त्यात पळीभर पाणी घालून ते धरून ठेवावे. (कंसात दिलेले उच्चार प्रात: संध्याचे वेळी म्हणू नयेत.) सूर्यश्‍चेतिमन्त्रस्य (सायं-अग्निश्‍चेति मन्त्रस्य) ब्रह्मा ऋषि:। सूर्य मनुमन्युपतयो रात्रिश्‍च (सायं-अग्निमन्युमन्युपतयोऽहश्‍च) देवता:। प्रकृतिश्छन्द:। मन्त्राचमने विनियोग:। ॐ सूर्यश्‍च (सायं-अग्निश्‍च) मा मन्युश्‍च मन्युपतयश्‍च  मन्युकृतेभ्य:। पापेभ्यो रक्षन्ताम्। यद्रात्र्या (यदह्ना) पापमकार्षम्। मनसा वाचा हस्ताभ्याम्। षद्भयामुदरेण शिश्‍ना। रात्रिस्तदवलुम्पतु (सायं-अहस्तदवलुम्पतु) यत्किंच दुरितं मयि। इदम् हंमामृतयोनौ। सूर्ये (सत्ये) ज्योतिषि जुहोमि स्वाहा।)

     (6)द्वितीयमार्जनम्।-

 प्रथममार्जनाप्रमाणे आचमन करून 24 नावांचा उच्चार करावा. आचम्य- आपोहिष्ठेति नवर्चस्य सूक्तस्याम्बरीष: सिन्धुद्वीप आपो गायत्री पश्‍चमी वर्धमाना सप्तमी प्रतिष्ठा अन्त्ये द्वे अनुष्टुभौ मार्जने विनियोग:। ॐ। भूर्भुव:स्व:। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही। धियो यो न: प्रचोदयात्॥ॐ॥ ॐ आपो हि ष्ठा मयोभुवस्ता न उर्जे दधातन। महे रणाय चक्षसे॥ ॐ यो व: शिवतमो रसस्तस्य भाजयतेह न:। उशतीरिव  मातर:। ॐ तस्मा अरं गमाम वो यस्य क्षयाय जिन्वथ। आपो जनयथा च न:। ॐ शं नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये। शं योरभिस्त्रवंतु न:। ॐ ईशाना वार्याणां क्षयन्तीश्‍चर्षणीनाम्। अपो याचामि भेषजम्। ॐ अप्सु मे सोमो अब्रवीदन्तर्विश्‍वानि भेषजा। अग्निं च विश्‍वशंभुवम् ॐ आप: पृणीत भेषजं वरूथं तन्वे3 मम। ज्योक्च सूर्यं दृशे। ॐ इदमाप: प्रवहत यत्किंच दुरितं मयि। यद्वाहमभिदुद्रोह यद्वा शेप उतानृतम् ॐ आपो अद्याऽन्वचारिषं रसेन समगस्महि। पयस्वानग्न आगहि तं । मा संसृज वर्चसा। ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्म भूर्भुव: स्वरोम्॥ या तेराव्या मार्जनमंत्राऐवजी कोणी कोणी पुढीलप्रमाणे मंत्र म्हणतात. सस्त्रुषीरित्यस्यापोदेवीरनुष्टुप्। मार्जने विनियोग:॥ ॐ सस्त्रुषीस्तदपसो दिवा नक्त च सस्त्रुषी:। वरेण्यक्रतूरहमादेवीरवसे हुवे॥1॥

     (7) अघमर्षणम् ।-

 उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन ठेवावे व ‘ॐ ऋंतच’ पासून मंत्र म्हणून त्या पाण्यात उजव्या नाकपुडीने श्‍वास सोडावा. (त्या श्‍वासाबरोबर शरीरातील पापपुरूष त्या पाण्यात आला अशी कल्पना करून मग ते पाणी न पाहता डाव्या बाजूकडे भूमीवर जोराने टाकावे व नंतर आचमन करावे.) ॐ ऋतंचेतितृचस्य सूक्तस्य माधुच्छन्दसोऽघमर्षणो भाववृत्तिरनुष्टुप्। अघमर्षणे विनियोग:। ॐ ऋतं च सत्यं चाभीद्धात्तपसोध्यजायत। ततो रात्र्यजायत तत: समुद्रो अर्णव:॥1॥ समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत। अहोरात्राणि विदधद्विश्‍वस्य मिषतो वशी॥2॥ सूर्याचन्द्रमसौ धाता यथा पूर्वमकल्पयत्। दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो स्व:॥3॥ (आचम्य- आचमन करावे.

     (8) अर्घ्यप्रदानम्।-

 सूर्यासमोर (पूर्वेकडे) तोंड करून उभे राहावे. दोन उताणे हात ओंजळीसारखे करून धरावे. दोन्ही हाताचे अंगठे व तर्जन्या (अंगठ्याजवळची बोटे) ही बाजूस दूर धरावी. त्या ओंज़ळीत पाणी घ्यावे व ‘ॐ भूर्भुव: स्व:’ पासून ‘दत्तं न मम’ पर्यंत मंत्र म्हणून ओंजळीतील पाणी समोर किंचित फेकल्यासारखे करून ताम्हणात सोडावे. अशी तीन अर्घ्ये द्यावीत. मग उजव्या हातात पाणी घेऊन ’असावादित्यो ब्रम्ह’ हा मंत्र म्हणून हातातील पाणी स्वत:भोवती (उजव्या हाताकडे वळत वळत प्रदक्षिणा करीत) भूमीवर सिंचन करावे व आसनावर बसावे. (सायंसंध्येवेळी अर्घ्ये देताना पश्‍चिमेकडे तोंड करून उभे राहावे.) अर्घ्यप्रदानम्- गायत्र्या विश्‍वामित्र: सविता गायत्री श्रीसूर्यायार्घ्यदाने विनियोग:। ॐ भूर्भुव:स्व:। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही। धियो यो न: प्रचोदयात्॥ श्रीसूर्याय इदमर्घ्यं दत्तं न मम॥ (एवं त्रि:।) (असे तीन वेळा करावे.) ॐ असावादित्यो ब्रह्म। (अर्घ्यप्रदान झाल्यावर द्विराचमन करून प्राणायाम करावा.)

     (9) आसनविधि- 

आसनविधिसाठी डाव्या गुडघ्यावर उजवा पाय येईल अशी मांडी घालून बसावे. मग उजव्या पायाच्या गुडघ्यावर डावा हात उताणा धरावा, त्यावर उजवा हात उपडा ठेवावा आणि ‘पृथ्वीती मंत्र्यस्य’ पासून ‘ब्रह्मकर्म समारभे’ पर्यंत सर्व मंत्र म्हणावेत. पृथ्वीति मन्त्रस्य,मेरूपृष्ठ ऋषि:। कूर्मो देवता । सुतलं छन्द: । आसने विनियोग: । ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता। त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरू चासनम् ॥1॥ ऊर्ध्वकेशी विरूपाक्षि मांसशोणितभक्षणे। तिष्ठ देवि शिखाबन्धे चामुण्डे ह्यपराजिते॥2॥ अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता:। ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया॥3॥ अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम् । सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समारभे॥4॥

     (10) करन्यास।- 

अंगठ्यापासून करांगुलीपर्यंत पाच बोटांची अनुक्रमे- अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा,अनामिका, कनिष्ठिका (करांगुली) असे आहेत. दोन्ही हात उताणे धरून दोन्ही हातांवर प्रत्येक मंत्र म्हणून न्यास करावा. कृती- गायत्र्या विश्‍वामित्र: सविता गायत्री न्यासे जपे च विनियोग:। 1.हाताच्या अंगठ्याला तर्जनीने स्पर्श करावा. ॐ तत्सवितुरअंगुष्ठाभ्यां नम:। 2.अंगठ्याने तर्जनीला स्पर्श करावा. ॐ वरेण्यं तर्जनीभ्यां नम:। 3.अंगठ्याने मध्यमेला स्पर्श करावा. ॐ भर्गोदेवस्य मध्यमाभ्यां नम:।  4.अंगठ्याने अनामिकेला स्पर्श करावा. ॐ धीमही अनामिकाभ्यां नम:। 5.अंगठ्याने करंगळीला स्पर्श करावा. ॐ धियोयोन:कनिष्ठिकाभ्यां नम: । 6.दोन्ही हाताचे तळवे व हाताच्या मागील बाजूही एकमेकांवर टेकाव्यात. ॐ प्रचोदयात करतलकरपृष्ठाभ्यां नम:॥

     (11) हृदयादिन्यास ।-

1.उजव्या हाताने हृदयाला स्पर्श करा. ॐ तत्सवितु: हृदयाय नम:। 2.मस्तक. ॐ वरेण्यंशिरसे स्वाहा। 3.शेंडी. ॐ भर्गोदेवस्य शिखायै वषट् । 4.अंगात कचव (चिलखत) घालतात तसे दोन्ही हात शरीराच्या दोन्ही बाजूंनी मस्तकापासून खालपर्यंत फिरवावेत. ॐ धीमहि कवचाय हुम्। 5.उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी (तर्जनी, मध्यमा, अनामिका) अनुक्रमे उजवा डोळा, भुवयांच्या मध्य आणि डावा डोळा यांना स्पर्श करावा. ॐ धियोयोन: नेत्रत्रयाय वौषट्। 6.दोन्ही हातांनी टाळी वाजवावी. ॐ प्रचोदयात अस्त्राय फट्। 7.उजवा हाताची चुटकी वाजवीत तो हात मस्तकाभोवती फिरवावा. इति दिग्बन्ध:॥

     (12) पंचमुखी गायत्रीध्यानम्।- 

दोन्ही हात जोडून मनात गायत्रीदेवतेचे ध्यान करावे. मुक्ता विद्रुमेह मनील धवल च्छायै र्मुखै स्त्रि क्षणै र्युक्ता मिन्दुकला निबद्ध मुकुटां तत्त्वार्थ वर्णात्मिकाम्। गायत्री वरदा मयाङ् कुशकशा शूलं कपालं गुणं शंखं चक्रमथार विन्दयुगलं हस्तैवहन्तीं भजे॥1॥ अर्थ- प्रत्येक मुखाला तीन नेत्र व चंद्रकलेने युक्त असा एकेक मुकुट अशी पाच मुखे त्यातील मोती, पोवळी, सोने, इंद्रनीलमणि यांसारख्या कांतीने युक्त अशी चार मुखे व शुभ्रवर्ण एक मुख धारण करणारी तसेच वरदचिन्ह, अभयचिन्ह, अंकुश, चाबुक, शूल, कपाल, रज्जु, शंख, चक्र व कमलांची जोडी ही दहा चिन्हे दहा हातांनी धारण करणारी, ब्रह्मप्रतिपादक मंत्रस्वरूपिणी अशा गायत्रीदेवीचे ध्यान मी करतो. ध्यान- (प्रात:) बालां बालादित्यमण्डलमध्यस्थां रक्तवर्णां रक्ताम्बरानुलेपन-स्त्रगाभरणां चतुर्वक्त्रां दण्ड कमण्डल वक्ष सूत्रा भयाम चतुर्भुजां हंसासना रूढां ब्रह्म दैवत्या मृग्वेद मुदाहरन्तीं भूर्लोका धिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवताऽ ध्यायामि । अर्थ – बाल्यावस्था धारण करणारी, उदयकालीन सूर्यमंडलात राहणारी, लाल कांतीची तसेच वस्त्र, उटी व माला ही लाल रंगाची धारण केलेली, चार मुखांची, चार हातांमध्ये अनुक्रमे दंड, कमंडलु, जपमाला व अभयचिन्हे धारण करणारी, हंसासनावर बसलेली, ब्रह्मस्वरूपिणी, ऋग्वेद पठण करणारी, पृथ्वीची नियंत्रक अशा गायत्रीदेवीचे ध्यान मी करतो. ध्यान- (सायं) वृद्धां वृद्धादित्यमण्डलमध्यस्था श्यामवर्णां श्यामाम्बरा-नुलेपनस्रगाभरणा-मेकवक्त्रां शंखचक्रगदा-पद्मांकचतुर्भुजां गरुडासनारुढां विष्णुदैवत्यां सामवेदमुदाहरन्तीं स्वर्लोकाधिष्ठात्रीं सरस्वतीं नाम देवतां ध्यायामि। अर्थ- वृद्धावस्था धारण करणारी, अस्तकालीन सूर्यमंडालांत राहणारी, श्यामवर्णाची, श्यामवर्ण अशीच वस्त्रे, उटी, माला धारण करणारी, एक मुख असलेली, चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा व कमल धारण करणारी, गरुडासनावर बसलेली, विष्णुस्वरुपिणी, सामवेद पठण करणारी, स्वर्गलोकाचे नियंत्रण करणारी अशा स्वरस्वतीदेवीचे मी ध्यान करतो. आगच्छ वरदे देवि जपे मे संनिधौ भव। गायन्तं त्रायसे यस्माद्गायत्री त्वं तत: स्मृता॥1॥ अर्थ- उपासकांना इष्ट वर देणारी देवि! जपकाली तू माझ्या सान्निध्यात राहा. तुझे गुण गाणारांचे तू रक्षण करतेस म्हणून तुला ‘गायत्री’ असे म्हणतात. यो देव: सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे। प्रेरयेत्तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यमुपास्महे ॥2॥ अर्थ- जो सवितादेव धर्मादि विषयांमध्ये आमच्या बुद्धीची प्रवृत्ति करतो त्याच्या त्या श्रुत्यादि व सर्वश्रेष्ठ तेजाची मी उपासना करतो.

     (13) गायत्रीमुद्रा | Gayatri Mudras –

बोटांच्या विशिष्ट हालचालींमुळे ज्ञानतंतुच्या शक्तीचा विकास होतो, शरीर तेजस्वी होते म्हणून या मुद्रा करा. अथातो दर्शन्मुद्रा सुमुखं संपुटं तथा॥ ततो वितता विस्तीर्णे द्विमुखं तत: ॥1॥चतुर्मुखं पंचमुखं षण्मुखाधो मुखे तत:॥ व्यापकांजलिकाख्यं च शकटं तदनन्तरम्॥2॥ यमपाशं तु ग्रंथितं तत: स्यात्समुखोन्मुखम्॥ प्रलंबो मुष्टिको मीनस्तत: कूर्मवराहकौ॥3॥ सिंहाक्रान्तं महाक्रान्तं ततो मुद्गर पल्लवौ॥ एता मुद्राश्‍चतुर्विंशत् गायत्र्या: सुप्रतिष्ठिता: ॥4॥ एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फलाभवेत । एता मुद्रा स जानाति गायत्री सफला भवेत॥

Gayatri Mantra Marathi

 बोटांच्या विशिष्ट हालचालींमुळे ज्ञानतंतुच्या शक्तीचा विकास होतो, शरीर तेजस्वी होते म्हणून या मुद्रा करा. अथातो दर्शन्मुद्रा सुमुखं संपुटं तथा॥ ततो वितता विस्तीर्णे द्विमुखं तत: ॥1॥चतुर्मुखं पंचमुखं षण्मुखाधो मुखे तत:॥ व्यापकांजलिकाख्यं च शकटं तदनन्तरम्॥2॥ यमपाशं तु ग्रंथितं तत: स्यात्समुखोन्मुखम्॥ प्रलंबो मुष्टिको मीनस्तत: कूर्मवराहकौ॥3॥ सिंहाक्रान्तं महाक्रान्तं ततो मुद्गर पल्लवौ॥ एता मुद्राश्‍चतुर्विंशत् गायत्र्या: सुप्रतिष्ठिता: ॥4॥ एता मुद्रा न जानाति गायत्री निष्फलाभवेत । एता मुद्रा स जानाति गायत्री सफला भवेत॥

     (14) गायत्रीजप। Gayatri Japa- 

यज्ञोपवीत (जानवे) उजव्या हाताने धरून गायत्रीमंत्राचा 108 वेळा जप करावा. (जप करताना रूद्राक्षाची वा पोवळ्यांची माळ वापरतात.) प्रात:संध्येच्या वेळी पूर्वकडे व सायंसध्येच्या वेळी वायव्येकडे तोंड करून उभे राहून वा बसून जप करावा.

     (15)उपस्थानम्- 

उपस्थानाचे चार मंत्र म्हणण्यासाठी प्रात:संध्येच्या वेळी पूर्वदिशेकडे व सायंसंध्येच्या वेळी पश्‍चिमेकडे तोंड करून मस्तक नम्र करून हात जोडून उभे राहावे. प्रात:संध्येच्या वेळी पहिल्या मंत्रातील ‘मित्रस्येति चतसृणां’ पासून ‘इष इष्टव्रता अक:’ पर्यंत म्हणावे व सायंसंध्येच्या वेळी तो मंत्र न म्हणता त्याऐवजी ‘तत्त्वायामि’ पासून ‘प्रमोषी:’ पर्यंतचा मंत्र म्हणावा. यापुढील दुसरा, तिसरा व चौथा हे मंत्र प्रात:संध्या व सायंसध्या या दोहोंमध्येही म्हणावेत. मित्रस्येति चतसृणां गाथिनो विश्‍वामित्रो मित्रो गायत्रीउपस्थाने विनियोग:। ॐ मित्रस्य चर्षणीधृतोऽवो देवस्य सानसि। द्युम्नं चित्रश्रवस्तमम्॥1॥ अभि यो महिना दींव मित्रो बभूब सप्रथा:। अभि श्रवोभि: पृथिवीम् ॥2॥ मित्राय पंच येमिरे जना अभिष्टिशवसे। स देवान्विश्‍वान् बिभर्ति॥3॥ मित्रो देवेष्वायुषु जनाय वृक्तबर्हिषे। इष इष्टव्रता अक:॥4॥ (इति प्रात:) 1)तत्त्वायामि शुन:शेपो वरुणस्त्रिष्टुप् उपस्थाने विनियोग:। ॐ तत्त्वा यामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भि:। अहेळमानो वरुणेह बोध्यु-रुशंस मा न आयु: प्रमोषी:॥1॥ (इति सायाम) 2)जातवेदसे सुनवाम सोममरातीयतो निदहाति वेद: । स न: पर्षदति दुर्गाणि विश्‍वा नावेव सिन्धुं दुरितात्यग्नि: ॥ 3)तच्छंयो: शंयुर्विश्‍वेदेवा: शक्वरी उपस्थाने विनियोग:। ॐ तच्छं योरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु न: स्वस्तिर्मानुषेभ्य:। उर्ध्वं जिगातु भेषजं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे 4)नमो ब्रह्मणे इत्यस्य प्रजापतिर्विश्‍वेदेवा जगता उपस्थाने विनियोग:। ॐ नमो ब्रह्मणे नमो अस्त्वग्नये नम: पृथिव्यै नम ओषधीभ्य:। नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे महते करोमि॥ ॐ शांन्ति: शांन्ति: शांन्ति:।

     (16) दिग्वंदनम्- 

उपस्थान झाल्यावर उभे राहूनच दिशावंदन करावे = (पूर्व) प्राच्यै दिशे इन्द्राय च नम:। (अग्नेय) आग्नेय्यै दिशे अग्नये च नम:। (दक्षिण) दक्षिणस्यै दिशे यमाय च नम:। (नैऋत्य) नैर्ऋत्यै दिशे निर्ऋतये च नम:। (पश्‍चिम) प्रतीच्यै दिशे वरूणाय च नम:। (वायव्य) वायव्यै दिशे वायवे च नम:। (उत्तर) उदीच्यै दिशे सोमाय च नम:। (ईशान्य) ईशान्यै दिशे ईश्‍वराय च नम:। (आकाश) ऊर्ध्वायै दिशे ब्रह्मणे च नम:। (जमिन) अधरायै दिशे अनन्ताय नम:। संध्यायै नम:। विद्यायै नम:। गायत्र्यै नम:। सावित्र्यै नम:। सरस्वत्यै नम:। सर्वाभ्यो देवताभ्यो नमो नम:। आ सत्यलोकादा पातालादा लोकालोकपर्वतात् । ये सन्ति ब्राह्मणा देवास्तेभ्यो नित्यं नमो नम:॥1॥   

     (17) प्रदक्षिणा | Pradakshina- 

प्रदक्षिणामंत्र म्हणत (तीन वेळा) आपल्या सभोवती प्रदक्षिणा करावी. स्वत:भोवती प्रदक्षिणा करताना आपल्या उजव्या हाताच्या बाजूकडे वळत प्रदक्षिणा पूर्ण करावी. प्रदक्षिणा।- भद्रं न इति मन्त्रस्य, ऐन्द्रो विमद ऋषि:, अग्नि: परमात्मा देवता, एकपदा विराट् छन्द:, जपदोषापनुपत्तये प्रदक्षिणाव्रर्तने विनियोग:। ॐ भद्रं नो अपिवाताय मन:।

(18) अभिवादनम्।-

 स्वत:चे गोत्र, प्रवर, वेदशाखा यांचा उच्चार करून आपले संध्येतले नाव उच्चारून अहं भो अभिवादये। असे म्हणत संध्यादेवतेला नमस्कार करावा. हे अभिवादन करताना विशेष रीतीने नमस्कार करावयास सांगितले आहे ते असे- डावे पाऊल, उजवा गुडघा व मस्तक ही भुमीवर टेकवावी तसेच दोन हातांचे स्वस्तिक करून उजव्या हाताने डाव्या कानाला स्पर्श करावा व डाव्या हाताने उजव्या कानाला स्पर्श करून अभिवादन करावे.

    (19) विसर्जनम्।-

 नंतर हात जोडून विसर्जन मंत्र म्हणावा. ॐ उत्तमे शिखरे जाते भूम्यां पर्वतमूर्धनि। ब्राह्मणेभ्योऽभ्यनुज्ञाता गच्छ देवी यथासुखम्॥1॥     

    (20) संध्याकर्म ईश्‍वरार्पणम्।-

 अभिवादन झाल्यावर आसनावर बसा व मंत्र म्हणा- आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्। सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति॥1॥ प्रमादात्कुर्वतां कर्म प्रच्यवेताध्वरेषु यत्। स्मरणादेव तद्विष्णो: संपूर्ण स्यादिति श्रुति:॥2॥ (उजव्या हातावर पाणी घेऊन ते उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांकडून समोर ताम्हणात सोडा व कर्म ईश्‍वरार्पण करावे.) अनेन प्रात: (सायं) संध्यावंदनेन भगवान् श्रीपरमेश्‍वर प्रीयताम्। (हात जोडावेत) विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम:। ईश्‍वर संतुष्ट होवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *