अथ लक्ष्मी-कुबेर संक्षिप्त पूजाप्रारंभ – लक्ष्मी पूजन कसे करावे | laxmi pujan marathi

लक्ष्मी पूजन

गृहप्रमुखाने सोवळे नेसावे. भांड्यात तांदूळ भरून त्यावर लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा ठेवून ते भांडे घरातील दागदागिने व पैशासह ताम्हणात घेऊन चौरंगावर अक्षदा ठेवून त्यावर ठेवावे. वडीलमंडळींना नमस्कार करून पूजेस प्रारंभ करावा.

लक्ष्मी पूजन आचमन करावे.

आचमन करावे- ॐ केशवाय नम:। ॐ नारायणाय नम:। ॐ माधवाय नम:। या तीन नावांचा उच्चार दोन वेळा आचमन करून करावा व नंतर ॐ गोविंदाय नम: म्हणून उजव्या हातातील पाणी ताम्हणात सोडावे व पुढील नावे उच्चारावीत- ॐ विष्णवे नम:। ॐ मधुसूदनाय नम:। ॐ त्रिविक्रमाय नम:। ॐ वामनाय नम:। ॐ श्रीधराय नम:। ॐ ऋषीकेशाय नम:। ॐ पद्मनाभाय नम:। ॐ दामोदराय नम:। ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम:। ॐ प्रद्युम्नाय नम:। ॐ अनिरूद्धाय नम:। ॐ पुरूषोत्तमाय नम:। ॐ अधोक्षजाय नम:। ॐ नारसिंहाय नम:। ॐ अच्युताय नम:। ॐ जनार्दनाय नम:। ॐ उपेन्द्राय नम:। ॐ हरये नम:। ॐ श्रीकृष्णाय नम:। नंतर प्राणायाम करावा- ॐ प्रणवस्य, परब्रम्ह ऋषि:। परमात्मा देवता। दैवी गायत्री छन्द:। सप्तानां व्याहृतीनां, विश्‍वामित्र-जमदग्नि-भरद्वाज-गौतमात्रि-वसिष्ठ-कश्यपा-ऋषय:। आग्निवाय्वादित्य बृहस्पति वरूणेन्द्र विश्‍वेदेवा देवता:। गायत्र्युष्णिगनुष्टुब्बृहती-पङ्क्ति-त्रिष्टुब्-जगत्यश्छन्दांसि। गायत्र्या, विश्‍वामित्र ऋषि:। सविता देवता। गायत्री च्छन्द:। गायत्रीशिरस: प्रजापतिर्ऋषि:। ब्रह्मग्निवाय्वादित्या देवता:। यजुश्छन्द:। प्राणायामे विनियोग:। ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम् । ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्। ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मं भूर्भुव: स्वरोम्।

नंतर ध्यान करावे. हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडावे व आपली दृष्टी देवाकडे लावावी.)- ॐ श्रीमन्महागणाधिपतये नम:। इष्टदेवताभ्यो नम:। कुलदेवताभ्यो नम:। ग्रामदेवताभ्यो नम:। स्थानदेवताभ्यो नम:। वास्तुदेवताभ्यो नम:। मातापितृभ्यां नम:। श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नम:। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम:। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम:। एतत्कर्म प्रधान देवतालक्ष्मी-कुबेरदेवताभ्योे नम:। आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नम:। निर्विघ्नमस्तु।

लक्ष्मी पूजन संकल्प.

पळीत पाणी घ्यावे व म्हणावे- श्रीमद्भगवतो महापुरूषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जंबुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणेतीरे (उत्तरतीरावर राहत असल्यास ‘उत्तरतीरे’ असा उल्लेख करावा. ज्या ठिकाणी ‘अमुक’ हा शब्द आला आहे तिथे पूजेच्या दिवशीचे पंचांग पाहून त्याप्रमाणे संवत्सर, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, चंद्रराशी, सूर्यराशी व गुरुराशी यांचा उल्लेख करावा.) शालीवाहन शके अमुक नाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानास्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवंगुण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ (येथे पूजा करणार्‍याने स्वत: म्हणावे.)

संकल्प

संकल्प- मम आत्मन: श्रुति स्मृति पुराणोक्त, वेदोक्त फलप्राप्त्यर्थम् अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु: आरोग्य ऐश्‍वर्य प्राप्त्यर्थम् सकल पीडा परिहारार्थम् मनेप्सित सकल मनोरथ सिद्ध्यर्थं श्रीलक्ष्मी-कुबेरदेवता प्रीत्यर्थम् यथा ज्ञानेन यथा मिलित् उपचार द्रव्यै: ध्यानावाहनादि पंचोपचार पूजां करिष्ये

गणपती पूजन

(उजव्या हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.) तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति-स्मरणं तथा पूजनं च करिष्ये। ताम्हणात सुपारी घेऊन (गणपती समजून) शुद्धोदक, पंचामृत व पुन्हा शुद्धोदक घालावे. मग वंदन करून स्वच्छ पुसून चौरंगावर अक्षदा ठेऊन त्यावर ठेऊन गंध, पुष्प, दूर्वा व अक्षता अर्पण करून म्हणावे- सुमुखश्‍चैकदंतश्‍च कपिलो गजकर्णक: । लंबोदरश्‍च विकटो विघ्ननाशो गणाधिप: ॥1॥ धूम्रके तुर्गणा ध्यक्षो भालचंद्रो गजानन:। द्वादशैतानि नामानि य: पठेच्छृणुयादपि॥2॥ विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा। संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते॥3॥ शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं। प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये॥4॥

लक्ष्मी-कुबेर पूजन

नंतर लक्ष्मी-कुबेराची प्रतिमा ताम्हणात घेऊन त्याची शुद्धोदक घालून पंचामृत घालावे व म्हणावे- पयोदधि धृतंचैव मधु शर्करयायुतम् । पंचामृते न स्वपनं क्रियतां परमेश्‍वर॥ नंतर शुद्धोदक स्नान घालून देव पुसून जागेवर ठेऊन हळदी-कुंकु, गंध, मंगळसुत्र व कार्पासवस्त्रादी अर्पण करून ऋतुकालोद्भव (झेंडूची फूले) च सर्वोपचारार्थे अक्षदाम् समर्पयामी। असे म्हणून अक्षदा वाहाव्यात व म्हणावे- सर्वमंगल मागल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तु ते ॥

लक्ष्मी पूजन नैवेद्य

त्यानंतर पेढे, बेसनाचे लाडू, धने, गूळ, साळीच्या लाह्या व बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून श्रीगणेश व लक्ष्मीची आरती म्हणावी.

आरती वैभवलक्ष्मी-

आरती लक्ष्मीची। वैभव सुखसंपत्तीची। गुरुदास विष्णु गाई दावि वाट वैभवाची॥ आरती लक्ष्मीची॥ध्रु॥ तिन्ही देवता या नामी। काली सरस्वती लक्ष्मी। विष्णुपत्नी त्यात साची। दावी वाट वैभवाची॥ आ. लक्ष्मीची॥1॥ कमळांत जन्म झाला। कमलजा म्हणती तुला। अस्थीर तुला करते। बोच पद्म परागांची॥ आ. लक्ष्मीची ॥2॥ येई तुला चंचलता। पायी पराग बोचता। व्रताने तू होशी स्थिर। वर्षा करी वैभवाची॥ आ. लक्ष्मीची॥3॥ अलंकार सुवर्णाचे। तुझ्या फार आवडीचे। त्यांत वास आई तुझा। म्हणूनी पूजा सुवर्णाची॥ आ. लक्ष्मीची ॥4॥ इवलिशी सेवा करता। येई तुला प्रसन्नता। धन्य तुझ्या औदार्याची। दाविसि वाट वैभवाची ॥ आ. लक्ष्मीची ॥5॥ अनाथांची स्वार्थी भक्ती। तरी देण्या त्यांना मुक्ती। रंजल्या गांजल्यांना। दाविसी वाट वैभवाची ॥ आ. लक्ष्मीची ॥6॥ संध्याकाळी शुक्रवारी। वाट तुझी सुखकारी। पाहताती भक्त त्यांना । दाविसि वाट वैभवाची ॥ आ. लक्ष्मीची ॥7॥ वैभव लक्ष्मीचे व्रत। सुवासिनी ज्या करीत। उन्नती करण्या त्यांची। दाविसि वाट वैभवाची ॥ आ. लक्ष्मीची ॥8॥ शंका कुशंका त्यजून। ठेवोनिया स्वच्छ मन। करता सेवा नारायणी। दाविसि वाट वैभवाची॥ आ. लक्ष्मीची0॥9॥ मनोभावे करू सर्व। नको अहं नको गर्व। लक्ष्मी पायी होता लीन। दाविल खुण वैभवाची ॥ आ. लक्ष्मीची ॥10॥ शरण आलो आम्ही तुज। तुझ्या चरणींचे रज। कृपा करी प्रसादाची। करुनि वर्षा वैभवाची ॥ आ. लक्ष्मीची ॥11॥ वैभव सुख संपत्तीची। गुरु-दास-विष्णु गाई। दावि वाट वैभवाची॥ आ. लक्ष्मीची ॥12॥

मंत्रपुष्प म्हणून ते अर्पावे. लक्ष्मी-कुबेराला नमस्कार करून प्रसाद वाटावा. सकाळी पुनरागमनाय च। म्हणून अक्षता वाहून पुजाविसर्जन करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *