अंबे एक करी श्री रेणुका मातेची नित्य प्रार्थना | Ambe ek kari udas na kari lyrics in Marathi Renuka mata.
अंबे एक करी, उदास न करी, भक्तास हाती धरी ।
विघ्ने दुर करी, स्वधर्म -उदरी, दारिद्र्य माझे हरी ।
चित्ती मुर्ती बरी, वराऽभय करी, ध्यातो तुला अंतरी ।
वाचा शुद्ध करी, विलंब न करी पावे त्वरे सुंदरी ॥ १ ॥
माते एकविरे, वराऽभयकरे, दे दु दयासागरे ।
माझा हेतु पुरे, मनात न उरे, संदेह माझा हरे ।
जेणे पाप सरे, कुबुद्धी विसरे, ब्रह्मैक्य-धी संचरे ।
देई पुर्ण करे भवाम्बुधी तरे ऐसे करावे त्वरे ॥ २ ॥
अनाथासी अंबे नको विसरु वो ।
भवस्सागरी सांग कैसा तरु वो ।
अन्यायी मी हे तुझे लेकरु वो ।
नको रेणुके दैन्य माझे करु वो ॥ ३ ॥
मुक्ताफलेः कुंकुमपाटलांगी ।
संदेह तारानिक रैविभाती ।
श्री मुलपिठांचलचुडिकाया ।
तामेकविरां शरणं प्रपद्ये ॥ ४ ॥
सखे दुःखिताला नको दुखवु वो ।
दिना बालकाला नको मुकलु वो ।
ब्रीदा रक्षी तु आपल्या श्री भवानी ।
हि प्रार्थना एकुनी कैवल्यदानी ॥ ५ ॥
॥ इति श्रीरेणुकामाता प्रार्थना संपूर्णा ॥