वास्तुशास्त्र देवघर | Devghar | Vastu of pooja room.

देवघर | Devghar | Vastu of pooja room.

ज्या देवांनी आपल्यावर कृपा करून आपणास वास्तु दिली व ज्यांची कृपा आपल्यावर कायम राहावी असे आपणास वाटते त्या भगवंताला आपल्या घरात एक छान देवघर( Devghar) असावे.

मुख्य वास्तूचा ईशान्य कोपरा म्हणजे ईश्‍वराचे स्थान. पुजेपेक्षा प्रथम प्रवेश, पाणी याला प्राधान्य देणे वास्तुधारकाला जास्त महत्त्वाचे आहे. ही दिशा पूजनीय आहे. मुख्य वास्तूचा वा प्लॉटचा इशान्य कोपरा हा जास्तीत जास्त मोकळा व वजनाने हलका असावा. ईशान्य दिशेचा स्वामी ईश आहे. म्हणून ईश्‍वराची दिशा आहे. इथे देवघर असावे. शिवाय पूर्व व उत्तरेलाही देवघर चालते. अन्यथा घरात वाद, कलह, चिंता, अडथळे निर्माण होतात. ब्राह्मणांसाठी वायव्य कोपर्‍यात, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे देवघर आदिती व ईश या कोपर्‍यात देवघर असावे. पूर्वेकडून पश्‍चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे शुभ लहरींचा प्रभाव वाहता असतो. पूर्वेकडे वा उत्तरेकडे तोंड करून बसणार्‍या क्षत्रिय, वैश्य व शूद्र या शक्तिजीवी वर्गाला आपल्या शक्ति बळकट करण्यासाठी या शुभ लहरींचा उपयोग होतो. 

 • देवघराच्या वर, खाली, बाजूला टॉयलेट नसावे. | There should not be toilet beside of the as per Vastu of pooja room.
 • देवाच्या नजरेसमोर तिजोरी नसावी. | There should not be cash chest in front of the as per Vastu of pooja room.
 • देवघराची उंची आपण देवासमोर पाटावर बसल्यावर आपल्या नाभीपेक्षा उंच असावी. 
 • उपासना करताना आपले तोंड पूर्वेकडे वा उत्तरेकडे असावे. यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात. 
 • देवाचे तोंड आपल्याकडे असावे.
 • ध्यानधारणा करताना मात्र अगदी देवाच्या नजरेसमोर बसू नये. 
 • देवांची संख्या जास्त नसावी. 
 • एकवितीपेक्षा देवाची उंची जास्त नसावी. 
 • देव भंगले तर त्यांचे विसर्जन करून विधीवत दुसरे देव बसवावे. 
 • देवघरातील समई, दिवा इ. ची जागा देवाच्या डाव्या बाजूला म्हणजे आग्नेय कोपर्‍यात करावी. 
 • उदबत्ती, धूप वायव्य दिशेस ठेवावे. देवघरात गाईच्या तूपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावावा. 
 • इतर खोल्यात देवांचे फोटो लावले तर चालतात परंतु त्या फ्रेम भिंतीवर समोरासमोर लावू नये कारण एका देवाला नमस्कार करताना दुसर्‍या देवाकडे पाठ होते. 
 • शक्य असल्यास देवघर सोडता इतर ठिकाणी फोटो लावू नयेत. 
 • फक्त योग्य ठिकाणी देवघर ठेवल्यामुळे आयुष्यातला गुंता सुटतो.
 • देवघर जमिनीपासून एकदोन फूट उंचीवर असणे चांगले. काही घरे फार लहान असल्यामुळे भिंतीवर टांगलेले असतात. ही गोष्ट ठिक असले तरी त्याच्यावर काही ठेवू नये. 
 • स्त्रियांच्या मासिक पाळी मध्ये देवघरात जाऊ नये.
 • देवघरात बसून शिव्या, शाप, तळतळाट देवू नये
 • पूजाघरास लाकडाचा उंबरठा अवश्य करून घ्यावा. दर पौणिमेला या उंबरठ्यास गोमुत्रात हळद कालवून त्याचा लेप लावावा.
 • छोटे देवघर असल्यास ते जमिनीवर ठेवावे अडकवून ठेवू नये.
 • देवतांचे मुख एकमेकांसमोर येतील असे ठेवू नये.
 • जास्तीत जास्त ध्यान धारणा व नामस्मरण करावे.
 • घराच्या ईशान्य खोलीत जर देवघर ठेवता येत नसेल आणि दोन किंवा तीन खोल्या असतील तर शक्‍यतो कोणत्याही खोळीत ईशान्य कोपर्‍यात देवघराची रचना करावी.

बेडरूम वा किचनमध्ये देवघर असू नये. कारण बेडरूम ही श्रृंगारखोली असते आणि कीचन मध्ये मांसाहार बनवणे वा स्त्रियांचा अधिक वावर असतो. 

देवघरात एकाच देवाच्या जास्त मूर्ती वा फोटो असू नयेत. जर असतील तर विधीपूर्वक त्याचे पाण्यात विसर्जन करावे. देवघरात श्रीगणपती, श्रीकुलदेवी- कुलदैवत, शिवलींग, बाळकृष्ण, अन्नपूर्णा व आपले आवडते ईष्ट देव ठेवावे. श्रीगणपती उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक (सिद्धीचा दाता) असू नये. तर ऋद्धी गणेश म्हणजे डाव्या सोंडेचा भौतिक सुख प्रदान करणारा श्रीगणेश ठेवावा कारण आपण संसारी गृहस्थ असल्यामुळे आपणास अनेक भौतिक अपेक्षा असतात. देवघरात मृत व्यक्तिंचे फोटो वा प्रतिकात्मक प्रतिमा ठेवू नये. उत्तरपूर्व भागा व्यतिरिक्त घरात इतर ठिकाणी देवाचे फोटो वा स्टिकर्स लावू नयेत. देवांच्या मूर्ती स्वच्छ करताना लिंबू-हळदीचे मिश्रण वापरावे. केमिकल्स वापरू नयेत. कित्येक घरात देवांची कधी पूजा होत नाही किंवा होत नसावी अशी अवस्था असते म्हणून देवघर स्वच्छ सुंदर, पवित्र असावे
सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी. रोज एक तेलाचा दिवा आणि निरांजन लावले .तर फारच उत्तम. दर गुरूवारी धुप जाळावा.

वर्षातून एकदा तरी घरात होमहवन, शुभविधी करावा.

     वर्षातून एकदा तरी घरात होमहवन, शुभविधी करावा. देवघराला कळस असू नये. तो मंदिराला असतो. कळसामुळे त्याच ठिकाणी ऊर्जालहरींचे केंद्रिकरण होते व घरात सर्व ठिकाणी समप्रमाणात ऊर्जालहरी असणे आवश्यक असते. देव्हारा मार्बल असावा. शिसवी लाकडाचा अति उत्तम. पूर्वेकडे तोंड करून पूजेला बसावे त्यामुळे देवांची तोंडे पश्‍चिमेला असावी. ताम्हण, फुलपात्र, घागर तांब्याच्या असाव्यात, चांदीच्या किंवा सोन्याच्या असल्यास त्याचे पुण्य अधिक असते. देवतांचे हार, श्रीविष्णूला तुळस, श्रीगणेशाला दूर्वा व जास्वंदीची फुले, महालक्ष्मीसाठी कमळ, श्रीशिवलिंगासाठी बेल असावा. आंब्याचा डहाळा, झेंडूची फुले असावीत. सर्व पदार्थ ताटात ठेवून देवाला नैवेद्य दाखवल्यावर घरातील सदस्यांनी भोजन करावे. पुजा झाल्यावर कापडाचा  पडदा वा दार देवघराला लावावे. त्यातून देव बाहेर दिसले पाहिजे म्हणजे स्त्रियांच्या अडचणीच्या काळात देवघराचे पावित्र अबाधित राहील. श्रीगणेश, श्रीलक्ष्मी व श्रीसरस्वती यांचे उभे फोटो व मूर्ती असू नयेत, सर्व मूर्ती बसलेल्या असावेत. पूजाघरासमोर पांढरा वा पिवळा रंग शुभकारक आहे. त्यात पिवळा रंग अधिक चांगला. टाकाऊ वस्तू देवघराजवळ असू नये. पूर्व दिशेला देवघर असेल तर ऐश्‍वर्य लाभ, समाजात मान, प्रतिष्ठा मिळते. इंद्रदेव, मेषेचा मंगळ व रविसूर्यनारायण पूजा आपल्या हातून नकळत होत असते त्यामुळे मनाला स्फूर्ति मिळते. म्हणजे देवघर ईशान्य, पूर्व आणि उत्तर या दिशेमध्येच असावे. त्यामध्ये ईशान्य अतिउत्तम. उत्तरेला देवघर असेल तर कुबेर देवता उत्तर दिशेला असते, मकर रास, बुध ग्रह म्हणजे साक्षात धनाची वा कुबेराची पूजा करण्याचे भाग्य मिळते. इतर दिशेला देवघर असेल तर त्यातून देवत्व मिळणे अवघड जाते. देवाची दिशा म्हणजे ईश्‍वराची दिशा म्हणून तिथे पाणी किंवा ईश्‍वर असावा.

अग्निहोत्र

अग्निहोत्र :- वास्तुतील ऊर्जा वाढण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अग्निहोत्र सांगितलेले आहे. सूर्योदय व सूर्यास्ताला ते केले जाते. सूर्योदयाला केलेल्या अग्निहोत्राचा परिणार दिवसभर वास्तूला होतो. रोगजंतू व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. याचा परिणाम मुलांच्या व इतरांच्या आरोग्यावर होतो. मुले शांत राहतात. यासाठी गोमय वस्तू लागतात- गौरी, त्यावर न तुटलेले 50-60 पूर्ण तांदूळ, 5 थेंब गाईचे तूप व त्यावर कापूर ठेऊन तो प्रज्वलित करावा. रोज सकाळी सूर्योदयाला व सूर्यास्ताला हे करावे. शांतता व सकारात्मक ऊर्जा घराला लाभते. दर शनिवारी संध्याकाळी गाईचे तूप, 50-60 न तुटलेले तांदूळ, काळे तीळ, पांढरे तीळ तीन बोटात मावतील एवढे, 8 लवंगा या वस्तू गौरीवर ठेऊन जाळावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहिसे होते.

One thought on “वास्तुशास्त्र देवघर | Devghar | Vastu of pooja room.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *