सुखकर्ता दुखहर्ता | Sukhkarta Dukhharta
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी सेंदूराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥जयदेव जयदेव॥1॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुंम केशरा।
हिरे जडित मुगुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपूरे चरणी घागरीया॥जयदेव जयदेव॥2॥
लंबोदर पितांबर फणिवरबंधना।
सरळशुंड वक्रतुंड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥जयदेव जयदेव॥3॥
समर्थ रामदासस्वामी रचित श्रीगणेशाची दुसरी आरती
आरती सप्रेम जय जय स्वामी गजवदना । | aarti saprem jay jay swami gajavadana
आरती सप्रेम जय जय स्वामी गजवदना ।
तुझिया स्मरणे जाति पातके पार्वतीनंदना ॥
मोरया पार्वतीनंदना॥धृ॥
मस्तकी मुकुट जडिताचा शोभतो जाण।
कानी कुंडलांचीदीपके झळकती परिपूर्ण ॥
पायी घुंघुरवाळे घालूनि शोभति चरण ।
तुझिया दोंदावरी कंठी पदक घालून ॥1॥
मुषक वाहनावरी स्वारी करोनिया फिरसी ।
चंद्रमा तुजला हसे म्हणुनि शाप दिधलासी ॥
तेहतीस कोटी देव मिळोनी प्रार्थियले तुजसि ।
दया करा महाराज उ:शाप देउनिया त्यासी ॥2॥
भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस सुदिन ।
त्या दिवशी या चंद्रम्याचे पाहू नये वदन ॥
हाच शाप दिधला त्यासी ऐका हो जन ।
जे जन पाहतील मुख त्यासी दु:ख पीडा जाण ॥3॥
वत्से रक्षित असता कृष्णे सोम पाहिला।
स्यमंतक मणि जांबुवंत गृहा समीप नेला ॥
आळ आली श्रीकृष्णावरी क्रोधाने चढला ।
शोभा लागी जाता तेव्हा जांबुवंत मिळाला ॥4॥
रामचंद्रे जांबुवंत…
समर्थ रामदासस्वामी रचित श्रीगणेशाची तिसरी आरती | Ganpatichi aarti marathi
जय देव जय देव जय जय गणराजा । Jai dev jai dev Jai jai ganraja
जय देव जय देव जय जय गणराजा ।
सकळा देवा आधी तू देव माझा ॥धृ॥
उंदरावरी बैसोनि दुडदुडा येसि ।
हाती मोदक लाडू घेउनिया खासी ।
भक्तांचे संकटी धावूनि पावसी ।
दास विनविती तुझिया चरणासी ॥1॥
भाद्रपदमासी होसी तू भोळा ।
आरक्त पुष्पांच्या घालुनिया माळा ।
कपाळी लावुनिया कस्तुरी टिळा ।
तेणे तू दिससी सुंदर सावळा ॥2॥
प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापिला ।
समयी देव मोठा आकांत केला ।
इंदु येउनिया चरणी लागला ।
श्रीरामा बहुत श्राप दिधला ॥3॥
पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा ।
नेत्र शिणली तुझी वाट पाहता ।
किती अंत पाहसी बा विघ्नहर्ता ।
मजला बुद्धी देई तू गणनाथा ॥4॥