!! लो लो लागला !! | Navratri marathi aarti | lo lo lagla aarti.

1 लोलो लागला | lo lo lagla aarti | Navratri marathi aarti

लोलो लागला, अंबेचा भेदाभेद कैसा। आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ
मायेचा ।।धृ.।। प्रपंच हा खोटा मृगपाणी घोरे फिरतो प्राणी । कन्या-सुत-
दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी । अंती नेतील हे यमदूत, नये संगे
कोणी । निर्गुण रेणुका कुलदेवी जपतो मी निर्वाणी ।।१।। लोलो.. पंचभूताचा
अधिकार, केलासे सत्वर । नयनीं देखिला आकार अवघा तो ईश्वर ।
नाही सुखदुःख देहाला, कैचा अहंकार । पाहे परमात्मा तो ध्यानी भासे
शुन्याकार 1।२।। लोलो.. ध्याता मुद्रा ही उन्मनी, लागे अनुसंधानी ।
निद्रा लागली अभिध्यानी, जे का निरंजनी । लीला वार्णिता स्वरुपाची,
शिणली शेषवाणी । देखिली भवानी, जननी, त्रैलोक्यपावनी ।।३।। लोलो. .
गोंधळ घालीन मी अंबेचा घोष अनुहाताचा । दिवट्या उजळोनिया सदोदीत
पोत चैतन्याचा । आहें सोहं सो उदो उदो बोलती चारी वाचा ।1४1।
लोलो.. पहाता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ । जेथे जगदम्बा अवधूत
दोघे भोपी भट । जेथे मोवाळे विंजाळे प्रणिता पाणी लोट | तेथे तानाजी
देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ ।।५।। लोलो..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *