॥ आरती साडेतीन पीठाची ॥ Sadetin pithachi aarti | पैंजणाचा नाद आला गोड कानी ग.

॥ आरती साडेतीन पीठाची ॥


॥ पैंजणाचा नाद आला गोड कानी ग ॥
॥ उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ॥
। पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेउनी ।
। वैभवाचे सारे साज गळा घालुनी ।
। कोल्हापूर ची महालक्ष्मी दारी आली ग ।
॥ उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ॥१॥


। हिरवा रंग अती खुलवी फुलवी सुंदर ।
। हाती हिरवा चुडा भांगी लाल शेंदूर ।
। जय भवानी तुळजापूर ची दारी आली ग ।
॥ उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ॥ २ ॥


। रूप तिचे हे लावण्याचे अंगी सुंदर ।
। माहुरी राही रेणुका देवी शालू हिरवा ग ।
। लेकी लाही बघण्या आली माझ्या दारी ग ।
॥ उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ॥ ३ ॥


। तीन्ही पीठे झाली आता सार्धत्रीणि हो ।
। सैह्याद्री पर्वती वसते माझी आई हो ।
। लक्ष्मी भवानी रेणुका देवि सप्तश्रृंगी ग ।
॥ उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग ॥ ४ ॥


पाहि वळूनी दारा मधुनी माऊली
भक्त रक्षण करण्या झाली अष्टभुजा जननी
कुलस्वामिनी देवी बाई दारी आली ग

। उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग॥ ५।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *