शिवषडक्षरस्तोत्रम् | shiv Shadakshar Stotra
ॐकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः ।
कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः ॥ १ ॥
नमन्ति ऋषयो देवा नमन्त्यप्सरसां गणाः ।
नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः ॥ २ ॥
महादेवं महात्मानं महाध्यानपरायणम् ।
महापापहरं देवं मकाराय नमो नमः ॥ ३ ॥
शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकम् ।
शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः ॥ ४ ॥
वाहनं वृषभो यस्य वासुकिः कण्ठभूषणम् ।
वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः ॥ ५ ॥
यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्र्वरः ।
यो गुरुः सर्वदेवानां यकाराय नमो नमः ॥ ६ ॥
षडक्षरमिदं स्तोत्रं यः पठेच्छिवसंनिधौ ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥ ७ ॥
॥ इति श्रीरुद्रयामले उमामहेश्र्वरसंवादे शिवषडक्षरस्तोत्रं संपूर्णम् ॥
शिवषडक्षर स्तोत्र मराठी अर्थः | Shiv Shadakshar Stotra Meaning in Marathi
१) ज्या बिन्दुसंयुक्त ‘ ॐ ‘काराचे योगिलोक निरंतर ध्यान करतात, त्या सर्व ईच्छा आणि मोक्षसुद्धा देणार्या ‘ ॐ ‘ कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
२) ‘ न ‘ कारस्वरुप भगवान शंकरांना् ऋषि, देव, अप्सरा आणि मनुष्य नमस्कार करतात. त्या ‘ न ‘ कारस्वरुप देव देवेश भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
३) ते देवतांमध्ये महान आहेत. सर्वश्रेष्ठ असे महात्मा आहेत. जे नेहमी महासमाधि मध्ये असतात, जे सर्व महापापांचा नाश करतात, ‘ म ‘ कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
४) जे या विश्र्वाचे परम कल्याणकर्ते आहेत, जे नेहमी शांत स्वरुपांत असतात, जे या विश्र्वाचे नाथ आहेत, त्या ‘ शि ‘ कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
५) वृषभ हे ज्यांचे वहान आहे, नागराज वासुकी ज्यांच्या कंठाचे भूषण आहे, ज्यांच्या डाव्या बाजूला शक्तिरुप पार्वती आहे, ‘ वा ‘ कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
६) सर्वत्र व्यापून असणारे जे देवांचे देव आणि गुरु आहेत अशा ‘ य ‘ कारस्वरुप भगवान शंकरांना (माझा) नमस्कार असो.
७) जो कोणी या षडक्षर स्तोत्राचा पाठ शिवाच्या सन्निध (मंदिरांत) बसून करतो, तो अंती शिवलोकास वास करतो.
अशा रितीने उमा-महेश्र्वर संवादांत श्रीरुद्रमलायांत असलले शिवषडक्षर स्तोत्र पूर्ण झाले.
संकलन :- अशोककाका कुलकर्णी