वास्तुशास्त्र कीचन (स्वयंपाकघर) | Vastu for kitchen in Marathi
घरातील प्रत्येक गोष्टीत त्या घरातील महिलांचा, गृहीणींचा सहभाग असल्यामुळे त्या घराचा कणा असतात. कीचनची रचना व वातावरण निर्मिती त्यांच्या शारिरीक व मानसिक विकासाला पोषक असणे महत्त्वाचे असते. कीचन वास्तूच्या आग्नेय कोपर्यातच असावे कारण आग्नेय कोपर्यात अग्नी असतो म्हणजेच अग्नी तत्व असते. हा कोपरा शुक्राचा आहे आणि शुक्र हा स्त्री ग्रह आहे. शुक्र जवळ मायक्रो इफिसिएंसि (micro efficiency) म्हणजेच सुक्ष्म कार्यक्षमता आहे. कोणत्याही कामा साठी जी सुक्ष्मता लागते ती शुक्र जवळ आहे आणि स्वयंपाक करणं हे सुक्ष्म काम आहे कारण यात कौशल्य वापरावं लागतं. म्हणूनच आपलं कीचन (स्वयंपाक घर ) हे आग्नेय कोपर्यात असावे.आग्नेय कोपर्यात कीचन असणे हे भाग्याच लक्षण आहे.
पूर्व दिशेकडे तोंड राहील अशी रचना गॅसची असावी. आरोग्याच्या दृष्टिने सकाळच्या सूर्यकिरणांचा प्रभाव खुप महत्त्वाचा असतो आणि यामुळे स्त्री च मन हे स्वयंपाक करताना नेहमी आनंदी असतं आणि एक चांगली ऊर्जा मिळते.
kitchen Vastu Tips | कीचन वस्तू टिप्स.
- घराच्या पश्चिम भागात डायनिंग टेबल असावे.
- जेवताना प्रत्येकाची तोंडे उत्तर वा पूर्वेला असावी.
- आग्नेय दिशेत एका कोपर्यात जिथे कोणाचे पाय पडणार नाही तिथे फरशीखाली वास्तुपुरुषाची स्थापना करावी.
- किचनचा केरकचरा त्या कीचनच्या वायव्य भागात ठेवावा.
- कीचन ओटा नेहमी आग्नेय कोपर्यामध्येच स्वयंपाकघराची रचना करताना ठेवावा. चुकू देऊ नये.
- अग्नि म्हणजे ऊर्जा, ऊर्जा म्हणजे उत्पत्ति, उत्पत्ति म्हणजे प्रगती. म्हणून कीचन वास्तूच्या आग्नेय कोपर्यातच असावे.
- कीचन कट्टा उलटा एल आकाराचा करावा म्हणजे पूर्वेपासून आग्नेयपर्यंत जायचे व थोडासाच दक्षिणेला राहील अशा पद्धतीने करावा.
- कट्टा करताना पूर्वेच्या भिंतीला टेकू नये. थोडेफार अंतर असावे.
- कीचन ओट्यावरचे सिंक स्त्रीच्या डाव्या हातास असावे.
- कीचनरूममध्ये डाव्या हातास पाणी चालते तर उजव्या हातास अग्नि. पाणी व अग्नि शक्यतो एकमेंकापासून लांब ठेवावे. तसे शक्य नसेल तर अग्नि व पाणी यांच्या मध्ये कडप्पा लावावा.
- कीचन कट्ट्याच्या दक्षिण आग्नेय भागात, मिक्सर, ग्राइंडर, हिटींग कॉईल असे अग्निशी संबंधीत इलेक्ट्रिकल वस्तू ठेवाव्यात.
- फ्रीज दक्षिणेच्या भिंतीला ठेवावा. ज्यायोगे त्याचे दार उघडताना उत्तर दिशेला उघडेल. थोडा पश्चिमेला ठेवला तर दार पूर्वेला राहील.
- नित्य उपयोगी आवश्यक किराणा माल मसाला, अन्नध्यान, तूप इ. ठेवण्यासाठी दक्षिणपश्चिम भिंतीलाच पोटमाळे, कपाट करावेत.
- पूर्वेच्या भिंतीला रॅक्स करू नका. कारण जडत्व दक्षिण वा पश्चिम भिंतीला मान्य आहे. पूर्व भिंत जड करू नका.
- तूप, तेल, मीठ सांडू नये. उघडेही ठेवू नये. लक्ष्मी निघून जाते.
- घरात भांड्यांवर भांडी आपटू नयेत.
कीचन चा ओटा आग्नेय दिशेस असून गॅसची रचना जर दक्षिण दिशेला असेल तर ? |Gas stove in south direction.
कीचन चा ओटा आग्नेय दिशेस असून गॅसची रचना जर दक्षिण दिशेला असेल तर स्त्री ही दक्षिणे कडे द्रुष्टी करून उभी असते. इथे बनणारे जेवण हे अतिशय स्वादिष्ट बनते. पण त्या स्त्री चा स्वभाव हळू हळू निगेटिव्ह होत जातो. कारण दक्षिणे कडची निगेटिव्ह ऊर्जा कीचन मध्ये येते. आणि हि निगेटिव्ह ऊर्जा त्या स्त्री ला निगेटिव्ह विचारच देते. उद्धरण :- जर मुलगा शाळेतून यायला उशिर झाला तर हि स्त्री निगेटिव्ह विचारच करेल.जर काही कारणांनी तुम्हाला गॅसची रचना बदलता येत नसेल तर यावर ऊपाय म्हणजे श्री हनुमाना चा डाव्या हातात गदा असलेला फोटो गॅसच्या विरुद्ध दिशेला असलेल्या भिंत वर लावा म्हणजे त्या स्त्री च्या मनात निगेटिव्ह विचार येणार नाही.
आग्नेय दिशेस स्वयंपाक घर असल्यामुळे काय फायदे होतात ? | South east facing kitchen.
आर्थिक आवक, भरभराट वाढते, सधनता वाढते. उत्तम आरोग्य, वाहनसुख मिळते. कौटुंबिक वातावरण चांगले राहते.घरा मध्ये आनंद दाई वातावरण असतं. घरातील महिलांच आरोग्य आणि मन प्रसन्न राहत.
कीचन ला कोणता कलर दिला पाहिजे ? | Vastu Shastra kitchen color.
(Vastu Shastra kitchen color) कीचन च्या भिंतीला कळा किंवा निळा कलर देऊ नका. आर्थिक आवक, भरभराट या साठी लाल रंगाच्या पेस्टल शेड्स किंवा ऑरेंज शेड्स नाहीतर पिंक शेड्स कीचन च्या भिंती लावा. मार्बल काळ्या रंगाचे नसावे तर ग्रीन कलर वापरावा. नीळ्या कलरच्या टाईल्स वा वस्तू वापरू नका, ठेवू नका.
गॅस शेगडीवर माळा किंवा कपाट का नसावे ? | kitchen exit door vastu.
गॅस शेगडीवर माळा किंवा कपाट अजिबात नसावे. असले तरी त्यात वस्तू ठेवू नयेत. कदाचित असे कपाट असेल तरं स्त्री त्या कपाटातून काही घेण्यास गेली तर तिला इजा होऊ नये असाही त्याचा अर्थ होइल तसेच माळा असेल तर त्यावर पाली फिरतात. कदाचित गॅसची उष्णता लागून खाद्यापदार्थात पडून धोका होऊ शकतो.
कीचन ला बाहेरील दार कुठे असावे.
स्वयंपाक घराच्या नैऋत्य दिशेला दरवाजा कधीच नसावा इथे असलेला दरवाजा चांगला नसतो तो व्याय चा मोठा कारक आहे. मग दरवाजा कुठे असावा तर तो २ किंवा २.५ फूट जागा सोडून असावा खाली चित्रात दाखवलं आहे दरवाजा कसा असावा ते. जर स्वयंपाक घराच्या नैऋत्य दिशेला दरवाजा असेल आणि तो बदलता येत नसेल तर थिते वरच्या चौकटीला एका कोपऱ्यात एक पंच धातूचा त्रिशूल लावावा आणि बाहेरच्या बाजूने मारुती चा फोटो असलेल्या २ स्टईल्स लावा दरवाज्याच्या दोनी बाजूला एक एक अशा म्हणजे बराच फरक पडेल.
वेगवेगळ्या दिशेला कीचन असल्यास काय दोष निर्माण होतात ?
ईशान्य दिशेस कीचन | Vastu kitchen north east
ईशान्य दिशेस कीचन असल्यास म्हणावा तसा फायदा होत नाही. ईशान्य दिशेला देवाची ज्योत असते तर आग्नेयला ज्वाला असते. पूर्व भागात असेल तर प्रत्येक गोष्टीची काळजी लागते. दक्षिणेला असेल तर काही वेळेला अपयश मिळते.
नैऋत्य दिशेला किचन | kitchen in south west
नैऋत्य दिशेला किचन ओटा असेल तर सर्व घरात महिलांचेच राज्य राहते. चोरीचे भय राहते. नैऋत्येला किचन ओटा असेल किंवा संपूर्ण वास्तूच्या नैऋत्येला किचन ओटा असेल तर हात भाजणे, पोळणे असे प्रकार घडतात.
पश्चिमेला किचन | west facing kitchen
पश्चिमेला किचन असेल तर कष्ट-काळजी निर्माण करणार्या गोष्टी होतात. घशाशी संबंधीत दुखणी येतात. वायव्य दिशा वाईट नसते पण आग्नेय इतके प्रभावी नसते.
वायव्येच्या कीचनमुळे | vastu kitchen in north west
वायव्येच्या कीचनमुळे तर वायफळ खर्च होतात. अन्नधान्याला बरकत आणत नाही.कितीही किराणा भरला तरी महिना अखेरीस खडखडाट होतो.
कीचन चा ओटा जर उत्तरेला तोंड करून असेल तर ? | North facing kitchen vastu
कीचन चा ओटा जर उत्तरेला तोंड करून असेळ तर ( if you have North facing kitchen vastu ) कुबेराला जाळून स्वयंपाक कल्यासारखे होते. अन्नास पुरवठा रहात नाही आणि घरातील कर्ता अचानक आजारी पडू शकतो कर्जबाजारीपणा येतो. आतापर्यंत असे पाहण्यास आले की, उत्तरेकडे तोंड करून स्वयंपाक ओटा ज्या ज्या घरात आहेत त्या त्या घरांमध्ये अनेक प्रकारचे त्रास आहेत. महिला भरपूर आजारी पडतात. विशेषत: कर्त्यांच्या मागे आजारपण आणि कर्जबाजारीपणा दिसून येतो म्हणून किचन ओटा उत्तरेकडील भिंतीला नसावा. उत्तरेला ओटा असेल तर तो काढावा असे नाही पण पूर्वेला तोंड होईल असा स्वयंपाक व्हावा यासाठी छोटा का होईना एक ओटा किंवा रेडीमेड ओटा आणून त्यावर स्वयंपाक करावा मात्र उत्तरेला गॅस किंवा गरम काही पेटवू नये. असे आहे कीचन चे हे वास्तुशास्त्र.