राधा हि कृष्णा ची कोण ? | Radha kon hoti

राधा हि कृष्णा ची कोण हे तुम्हीच ठरावा. श्रीकृष्ण बारा दिवसांचे असताना यशोदेने त्यांचे बारसे करण्याचे ठरविले. गावातील महिलांना आमंत्रित केले. त्यात पूर्वजन्मातील ‘शबरी’ मथुरेपासून 50 कि.मी. वर ‘बरसाना’ या गावी पुनर्जन्म घेतलेली गोकुळनिवासी अनयाची पत्नी ‘राधा’ झाली होती. तिने पाळण्यात झोपलेल्या श्रीकृष्णास पाहिले आणि तिला तिचा पूर्वजन्म आठवला. शबरी असताना तिला आयुष्यभर प्रभू श्रीरामाची प्रतिक्षा करावी लागली होती तेव्हा प्रभू श्रीरामाने तिला वचन दिले होते. पुढच्या जन्मात तुला माझी भरपूर सेवा करता येईल. नागपुत्र ‘सुचंद्र’ यांनी देहत्यागानंतर ‘वृषभानू’ या नावाने जन्म घेतला. राधा ही वृषभानू व कीर्तिदार (राधेची माता पूर्वजन्मातील पितरांची कन्या ‘कलावती’ होती.) यांची मुलगी. ‘राधा’ या शब्दाचा अर्थ अत्यंत सुंदर आहे. रा= दान करणे व धा= निर्वाण, मोक्ष. ‘जी मोक्षाचे दान देते’ ती राधा. बारा दिवसांचे श्रीकृष्ण असताना आदिशक्तिचा अवतार असलेल्या राधेचे वय 23 वर्षांचे होते. 23 वर्षांची स्त्रि व बारा दिवसांचे मुल यांचे काय संबंध असू शकतात ? हे राधा व श्रीकृष्ण यांच्या संबंधाची टिका करणार्‍यांनीच ठरवावे. वयाच्या आठव्या वर्षी कंसाला मरण्यासाठी कृष्णप्रभू जे गोकुळातून बाहेर पडले ते कधीही गोकुळात आले नाही व राधाही आपल्या अनय या पतीस व आपला संसार सोडून कृष्णास भेटण्यास गेली नाही. राधेची कृष्णभक्ती सर्वांनी आत्मसात करावी एवढी आदर्श आहे. एकदा बाळकृष्णास ताप आला. वैद्याने सांगितले जो कृष्णभक्त आपल्या पायाखालची माती कृष्णास लावील त्याला ताप येईल व कृष्णाचा ताप जाईल तेव्हा आपल्या पायाची माती कृष्णास लाऊन त्यांचा ताप स्वीकारण्यास राधा सर्व प्रथम नंदाच्या घरी गेली व मला ताप येऊन मृत्यू आला तरी चालेल परंतु कृष्णाचा ताप जाऊ द्या असे म्हणू लागली अर्थात त्या लिलाधारकाचा ताप राधेला पाहताच नाहीसा झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

आजपासून लोक राधाबरोबर श्रीकृष्णाची पूजा करतील. | Radha Sobat Krishna chi pooja ka ?

राधाकृष्ण संबंधाबद्दल द्वारकेत असताना एकदा रूख्मिणीलाही संशय आला तेव्हा तिने राधेला द्वारकेत आमंत्रित करून उकळते दूध पिण्यास दिले. रात्री प्रभू श्रीकृष्ण जेव्हा रूख्मिणीच्या अंत:पूरात आले तेव्हा त्यांच्या पायावर पुरळ होते. कारण विचारल्यावर त्यांनी रूख्मिणीला उत्तर दिले, ‘प्रिये ! रात्री तुझ्याजवळ असणारे हे चरण दिवसभर राधेच्या हृदयात असतात. आज तू राधेला उकळलेले दूध पाजले ते माझ्या पायावरून गेल्यामुळे मला पुरळ आले.हे कृष्णवचन ऐकून रूख्मिणीला राधेचा अध्यात्मिक अधिकार लक्षात आला. तिने सर्व श्रीकृष्णपत्नींना आमंत्रित करून राधेची पाद्यपूजा करून ‘आजपासून लोक तुझ्याबरोबर श्रीकृष्णाची पूजा करतील’ असे राधेला वरदान दिले.

कंसाला मारण्यासाठी गोकुळ सोडून जेव्हा भगवान् श्रीकृष्ण गोकुळाबाहेर आले तेव्हा त्यांच्या रथासमोर झोपून राधेने रथ अडविला तेव्हा श्रीकृष्णाने प्रेमाने तिला उठविले व ‘माझा रथ अडवू नको’ अशी विनंती करून ‘निजधामाला जाण्यापूर्वी एकदा तुला मी अवश्य भेटण्यास येईल’ असे वचन दिले व ते वचन पूर्ण केले. धरतीवरचे आपले कार्य संपल्यावर जेव्हा ते निजधामाला जाण्यास निघाले तेंव्हा ते राधेला भेटण्यास गोकुळात आले.राधा यमुनेच्या वाळवंटात कृष्णध्यान करत होती.तिने प्रभूकृष्णास सांगितले ‘हे प्रभो! मी तुमच्या बालरूपावर प्रेम केले आहे त्या रूपात तुम्ही मला दर्शन द्या.’ राधेची इच्छा म्हणून श्रीकृष्णाने बाळकृष्णाचे रूप धारण केले. राधा त्या रूपात सदेह एकरूप झाली.

तुम्हाला काय उत्तर मिळाले हे कंमेंट मध्ये आम्हाला कळवा.

लेखक – श्री. प्रकाश ग. रामदासी (काळे)

Leave a Reply

Your email address will not be published.