जय जय भवानी !! Jay Jay Bhavani ManRamani | Navratri marathi aarti
जय जय भवानी, मनरमणी, मातापुरवासीनी । चौदाभुवनांची स्वामिनी।
महिषासुरमार्दिनी ।।जय।। धृ.।। नेसुनि पाठाव, पिवळा, हार शोभे गळा|।
हाती घेऊनिया त्रिशुळा, भाळी कुंकुम टीळा |।१।। अंगी लेवुनिया काचोळी,
वर मोत्यांची जाळी । हृदयी शोभतसे, पदकमळी, कंठी हे गरसोळी ।।२|।
पायी घागरिया, घुळघुळ, नाकीं मुकताफळ | माथां केश हे, कुरळ नयनींहो
काजळ ।।३॥। सिंहावरी तू बैसून, मारिसी दानवगण ।। तुजला विनवितो,
निशिदीन, गोसावीनंदन ।।४।|