अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् | नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप || 16||
अर्थः हे विश्वरूप हे विश्वेश्वर मी आपले अनंन्य रूप पाहत आहे . मला आपले असंख्य हात ,असंख्य डोळे असंख्य मुख असंख्य पोट दिसत आहे.
या रूपाचा ना आरंभ , ना मध्य, ना अंतः
विश्वरूप दर्शन | vishvaroop darshan
1. लहानपणी यशोदेला विश्वरूप दाखविले. ‘तू माती खाल्लीस का ? तुझे तोंड दाखव’ असे यशोदा म्हणाल्यावर ‘आपण माती खाल्ली नाही’ हे दाखविण्यासाठी त्यांनी आपले तोंड मोठे केले व त्या मुखात यशोदेला ब्रह्मांड सामावले आहे असे दिसले.
2. एकदा तिने गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक ठेवले व ती स्वयंपाकघरात काहीतरी कामानिमित्त गेली. श्रीकृष्णाने त्यातील काही मोदक खाल्ले. काम आटोपून आलेल्या यशोदेच्या हे लक्षात आल्यावर तिने श्रीकृष्णाला ‘तू मोदक खाल्लेस का?’ असे दरडावून विचारताक्षणी श्रीकृष्णात गणेश व गणेशात श्रीकृष्ण असे आलटून पालटून तिला सगुणदर्शन झाले व पुनश्च श्रीकृष्णाने आपले मुख मोठे केले तेव्हा तिला विश्वरूप दर्शन झाले.
3. कौरव-पांडवांचे युद्ध होऊ नये असे श्रीकृष्णाला वाटत होते कारण ‘युद्ध कोणालाच परवडत नाही, हिंसेने कोणताच प्रश्न सुटत नाही’ हे समजावून सांगण्यासाठी धृतराष्ट्राच्या दरबारात प्रभू श्रीकृष्ण शांतिदूत बनून कृष्णशिष्टाई करण्यासाठी गेले. दुर्योधनाने त्यांना पकडून कैदेत टाकण्याचा निर्धार केला. त्याचवेळी दरबारामध्ये श्रीकृष्णाने आपले विश्वरूप प्रगट केले.
4. कृष्ण व अर्जुन कुरुक्षेत्रावर होते त्यावेळी अर्जुन मोहग्रस्त झाला असता ‘या सर्व विश्वाचा मी नियंता आहे’ हे अर्जुनाला समजावून सांगण्यासाठी त्यांनी त्याला दिव्यदृष्टी देऊन विश्वरूप दर्शन दिले.
5. आठ वर्षाचा श्रीकृष्ण व बलराम कंसासारख्या क्रुर व बलाढ्य राजाला कसे सामोरे जातील ? याचे चिंतन व चिंता करणार्या अक्रुराने यमुनेच्या पात्रात स्नान करण्यासाठी डुबकी मारली आणि त्याला भगवान् श्रीकृष्णाचे विराट रूप दिसले. अक्रुराचे शंकानिरसन झाले. तो प्रभू श्रीकृष्णाला शरण आला. भगवान् श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपले विश्वरूप दाखविले.