धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा म्हणजेच कहाणी! निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट. श्रद्धेने आचरणात येणाऱ्या, व्रताची फलनिष्पत्ती सांगणे, हा कहाणीचा उद्देश असतो. चातुर्मासात आचरणात आणावयाची जी जी ब्रते व नियम आहेत, ती केव्हा, कशी व का घ्यावयाची, याचा
खुलासा या कहाण्यांमधून’ होतो. काही कहाण्या देवदेवतांचे माहात्म्य सांगणाऱ्या आहेत.
गणपतीची कहाणी
ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी,निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडाव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.
- Ganpati chi aarti “Akradana Gajavadan Deva”.