तुळशी/ तुळसी विवाह पौराणिक कथा शास्त्र आधारे | Tulasi vivah katha
तुळसी विवाह- भवमोक्षदा, हरिप्रिया, विष्णूवल्लभा या नावाने प्रसिद्ध असलेली तुळस सर्व धर्मात प्रिय आहे. धर्मात्मजाची मुलगी तुळसीदेवी भागीरथीच्या किनारी फिरत असताना तिला तपश्चर्या करणारा गणपती दिसला. तिने गणपतीजवळ लग्न करण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा गणेशाने मी लग्न करणारच नाही, असे तिला सांगितले तेव्हा तुझे अवश्य लग्न होईल असा शाप तुळसीने दिला त्यानंतर श्रीगणेशाने तुझा विवाह एका राक्षसाबरोबर होईल असा शाप दिला. तुळसीदेवी वृंदा या नावाने दुसर्या जन्मात जालंदराची पत्नी झाली (हि माहिती पद्मपुराण मध्ये उपलब्ध आहे ). असुर जालंधर पत्नी वृंदेच्या पातिव्रत्याने बलवान झाला. वृंदेच्या पतिनिष्ठेबद्दल देवांना जरी आदर होता तरी समाजावर अन्याय करणार्या जालंधराचा अंत ही गरजेची गोष्ट असल्याने देवांच्या ईच्छेने भगवान् श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भंग केले. त्यामुळे जालंधर मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार वृंदेच्या लक्षात आल्यावर तिने विष्णूला पाषाण व्हाल असा शाप देऊन ती जालंदराबरोबर सती गेली.तिच्या प्रेमाने शोकमग्न झालेले श्रीविष्णू वृंदेच्या चितेजवळ बसले तेव्हा सर्व देव चिंतामग्न झाले. श्रीविष्णूला शोकमुक्त करण्यासाठी लक्ष्मी, पार्वती व सरस्वती तेथे गेल्या व त्यांनी चितेवर तुळस, आवळा व मालती यांची तीन बीजे पेरली. मालतीने ईर्ष्येने पाहिल्याने ती अप्रिय झाली. तुळस व आवळा या रोपांनी श्रीविष्णूकडे प्रेमाने पाहिले म्हणून ते प्रिय झाले. तेव्हापासून तुळशीवर सर्वजण प्रेम करू लागले. तुळशीची नित्य पूजा करून प्रार्थना केली जाते.
हि तुळसी ची कथा, आता तुळसी विवाह कथा. | Tulasi Vivah Katha.
स्वर्गात वृंदेने विष्णूला अशी फसवणूक का केली ? हा प्रश्न विचारल्यावर विष्णूने देवकार्याची माहिती देऊन जालंधराच्या कुकर्माची हकिकत सांगितली. आता मला तुमचे पत्नीपद द्या अशी वृंदेने विष्णूला विनंती केली.माझ्या हृदयात लक्ष्मी असल्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. असे विष्णूने वृंदेस सांगून कृष्णा अवतारात मी तुझ्याशी विवाह करील व तू केलेल्या त्यागाप्रीत्यर्थ वर्षातून एक दिवस तुझ्याजवळ राहील तो दिवस लोक तुळसीविवाह म्हणून साजरा करतील. तेव्हापासून तुळसीला विष्णूप्रीया हे नाव पडले. वृंदेने रुक्मिणीचा अवतार घेतला व तीचा विवाह श्रीकृष्णाशी झाला. कृष्ण-रुक्मिणीचा विवाह कार्तिक शुद्ध द्वादशीला झाला. त्याची स्मृती म्हणून लोक आजही तुळसी विवाह संपन्न करतात.
तुलसी मंत्र. | Tulasi Mantra.
तुलसी श्रीसखि शुभे पापहारिणी पुण्य दे । नमस्ते नारद नुते नारायण मन: प्रिये॥